3 ऑक्टोबरपासून रंगणार T-20 महिला विश्वचषक स्पर्धा
3 ऑक्टोबरपासून रंगणार T-20 महिला विश्वचषक स्पर्धा
मुंबई - महिला टी-20 विश्वचषक 2024 UAE (दुबई)मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. 3 ऑक्टोबरपासून या महिला टी-20 विश्वचषकाला सुरूवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाने तीन वेळा विश्वचषकावर नाव कोरलं आहे. यंदा ऑस्ट्रेलिया आणि भारत यांना अंतिम सामन्याचे प्रतिस्पर्धी मानले जात आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात खेळवला जाणार आहे. तर भारताचा पहिला सामना न्यूझीलंडसोबत होणार आहे. 4 ऑक्टोबरला भारत आणि न्यूझीलंडचा संघ एकमेकांसोबत भिडणार आहे.
सहभागी संघ
महिला टी-20 विश्वचषकाची स्पर्धा 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार असून त्यांच्यामध्ये अंतिम फेरीसह 23 सामने खेळवले जाणार आहेत. या 10 संघांची प्रत्येकी पाचच्या दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारताबाबत बोलायचे झाले तर त्याचा समावेश अ गटात करण्यात आला असून त्यात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. बांगलादेश, इंग्लंड, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांना दुसऱ्या गटात ठेवण्यात आले आहे.
भारताचे सामने-
4 ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूझीलंड
6 ऑक्टोबर- भारत विरुद्ध पाकिस्तान
9 ऑक्टोबर- भारत विरुद्ध श्रीलंका
13 ऑक्टोबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
गटवारी-
Group A: ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, क्वालिफायर संघ-1
Group B: दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, क्वालिफायर संघ-2
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya