अंतराळवीर सुनीता विल्यम्स स्पेस स्टेशनवरून करणार USA च्या निवडणुकीत मतदान
अंतराळवीर सुनीता विल्यम्स स्पेस स्टेशनवरून करणार USA च्या निवडणुकीत मतदान
वॉशिग्टन डीसी -: शंभऱ दिवसांपासून अंतराळात अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचा साथीदार बुच विल्मोर यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) पत्रकार परिषद घेतली. शुक्रवारी भारतीय वेळेनुसार रात्री 12.15 वाजता सुरू झालेल्या या परिषदेत सुनीता आणि बुच यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. अमेरिकेच्या निवडणुकीत अंतराळातून मतदान करणार असल्याचे दोघांनी सांगितले.
मतदानासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बुच म्हणाले की, आजपासूनच त्यांनी मतदानाशी संबंधित निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. हे एक महत्त्वाचे कर्तव्य आहे. आपण मतदान कसे करू शकतो यावर नासा काम करत आहे. सुनीता विल्यम्स यांनी सांगितले की, त्या अंतराळातून मतदान करण्याबद्दल उत्साहित आहेत. 400 किलोमीटर अंतरावर असलेल्या स्पेस सेंटरमधून सुनीता आणि बुच यांनी सांगितले की त्यांनी नासाला अमेरिकेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पोस्टल बॅलेटची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे.
सुनीता आणि बुच यांनी 5 जून रोजी स्पेस स्टेशनवर उड्डाण केले. ते ६ जून रोजी अंतराळ स्थानकावर पोहोचले. ते १३ जूनला परतणार होते. पण, नासाच्या बोईंग स्टारलायनर यानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांचे परतणे पुढे ढकलण्यात आले. आता दोघेही 2025 मध्येच परत येण्याची शक्यता आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya