मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

राजकोट किल्ल्यावर ठाकरे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की …

राजकोट किल्ल्यावर ठाकरे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की …

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात मालवण राजकोट येथे कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आलेले शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि खासदार नारायण राणे यांच्या समर्थकात आज जोरदार धुमचक्री उडाली . एकमेकांना धक्काबुक्की करत दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला. यात एक पोलीस अधिकारी आणि एक महिला जखमी झाली आहे. त्या ठिकाणी उग्र तणावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान दोन्ही नेते आमने-सामने आल्यामुळे त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आज या परिसरात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. काही झाले तरी माघार घेणार नाही, यावरून दोन्ही गट काही काळ ठाम होते . त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळत त्या ठिकाणचा तणाव अखेर दूर केला मात्र या दरम्यान दोन्ही गटात जोरदार धक्काबुक्की आणि हाणामारीचा प्रकार घडला.

दरम्यान महाविकास आघाडी तर्फे पुतळा प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी मालवण मध्ये मोर्चा काढण्यात आला जोरदार घोषणा देत हा मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. याआधी महाविकास आघाडी चे नेते जयंत पाटील, आदित्य ठाकरे आणि विजय वडेट्टीवार यांनी सरकारचा निषेध करीत या घटनेची चौकशी निवृत्त न्यायाधिशां कडून करण्याची मागणी केली.


रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट