मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

जुगाराच्या नादात वृद्ध महिलेची हत्या; घराला आग लावून दागिनेही पळवले; आरोपीला 36 तासात अटक -

जुगाराच्या नादात वृद्ध महिलेची हत्या; घराला आग लावून दागिनेही पळवले; आरोपीला 36 तासात अटक - 

ठाणे- ऑनलाईन जुगार खेळाच्या नादात कर्जबाजारी झालेल्या तरुणानं कर्ज फेडण्यासाठी हत्येचा कट रचल्याचं समोर आलंय. ही घटना भिवंडी तालुक्यातील झाटेपाडा येथील फार्म हाऊसमध्ये घडली. धक्कादायक बाब म्हणजे घटनेच्या दिवशी वयोवृद्ध महिलेचा गळा कापून अंगावरील आणि घरातील सोन्याचे दागिने चोरी केली. तेवढ्यावच न थांबता घराला आग लावून आरोपी फरार झाला होता. मात्र, भिवंडी ग्रामीण पोलिसांनी तपास करत आरोपीला 36 तासाच्या आत अटक केली. अभिमन्यु गुप्ता असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

नेमकं प्रकरण काय ? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास मृत सेल्वामेरी अगस्टीन नाडर घरात एकट्याच असताना अभिमन्यु गुप्ता त्यांच्या घरात शिरला. त्यानं धारदार हत्यारानं वार करत या वृद्ध महिलेला ठार मारलं. त्यानंतर महिलेच्या अंगावरील आणि घरातील सोन्याचे दागिने चोरी केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं घराला आग लावून आरोपीनं पळ काढला. याप्रकरणी गावातील पोलीस पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 103 (1), 238 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सापळा रचून अटक- गुन्हा दाखल केल्यानंतर भिवंडी तालुका पोलिसांनी तपास सुरू केला. पोलीस तपासात मृत महिलेच्या मुलाकडे दूध डेअरीवर पूर्वी काम करणारा अभिमन्यु हा घटनेच्या दिवसापासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. तपासात सदरचा गुन्हा हा अभिमन्यु गुप्ता यानं केल्याचं निष्पन्न झालं. त्याचा शोध सुरू केला असता आरोपी ठाण्यातील एका लॉजमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 16 ऑगस्ट रोजी ठाण्यातील कापूरबावडी परिसरात असलेल्या लॉजवर सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं.

आरोपीनं दिली कबुली : पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आरोपीकडे अधिक चौकशी केली असता आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली. महिलेच्या मुलाकडे कामाला असताना घरात दागिने असल्याचं आरोपीला माहित होतं. त्यातच ऑनलाईन रमी जुगारात एक ते दीड लाख कर्ज झाले. ते कर्ज फेडण्यासाठी आरोपीनं महिलेची हत्या करून तिच्या अंगावरील आणि घरातील दागिने घेतले. हत्येचा संशय येऊ नये म्हणून घराला आग लावली, अशी कबुली त्यानं पोलिसांना दिली. आरोपीला 17 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केलं असता 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट