ब्रिटनला पराभूत करत भारतीय हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक
ब्रिटनला पराभूत करत भारतीय हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक
पॅरिस - पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारतावर आलेले निराशेचा मळभ आज हॉकी संघाच्या दमदार कामगिरीने दूर झाले आहे. भारतीय हॉकी संघाने आज पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रिटनचा पराभव करून मोठा पराक्रम केला आहे. त्याचबरोबर सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठली. चार क्वार्टर संपल्यानंतर दोन्ही संघांचा स्कोअर १-१ असा बोरबरीत होता. ज्यामुळे निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघांनी आघाडी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. यानंतर पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. ज्यामध्ये भारताने ब्रिटनचा ४-२ असा पराभव केला.भारतानं सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताची उपांत्य फेरीतील लढत आता 6 ऑगस्टला होणार आहे.
ग्रेट ब्रिटन आणि भारत यांच्यातील मॅचमधील पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. पहिल्या क्वार्टरनंतर भारताचा अमित रोहिदास याला रेड कार्ड देण्यात आलं. त्यामुळं तो बाहेर गेला यानंतर भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंग यानं एक गोल केला. त्यानंतर ब्रिटनच्या ली मॉर्टन यानं गोल केल्यानं1-1 अशी बरोबरी झाली. त्यानंतर दोन्ही संघांना गोल करता आला नाही.
भारताच्या बचाव फळीनं दमदार कामगिरी करत ब्रिटनला पुन्हा एकही गोल करु दिला नाही. पुढच्या दोन्ही क्वार्टरमध्ये भारताच्या बचाव फळीनं आणि गोल कीपर श्रीजेशनं बचाव करत ब्रिटनचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. अखेर मॅच पेनल्टी शुट आऊटमध्ये गेली. तिथं भारतानं 4-2 असं ग्रेट ब्रिटनला पराभूत केलं.
ब्रिटनकडून पहिला गोल जेम्स एल्बेरी यानं केला. यानंतर कॅप्टन हरमनप्रीत सिंह यानं गोल करताना ग्रेट ब्रिटनच्या गोल कीपरला चकवा दिला आणि भारताकडून पहिला गोल केला. यानंतर ब्रिटननं एक गोल केला. भारताकडून सुरजीत आणखी एक गोल केला. इंग्लंडचे यापुढचे दोन गोल करण्याचे प्रयत्न भारताचा गोल कीपर पीआर श्रीजेशनं हाणून पाडला. पेनल्टी शुट आऊटमध्ये भारताकडून तिसरा गोल ललितनं केला. भारताकडून चौथा गोल राजकुमार पाल यानं केला.
या सामन्यात भारत १० खेळाडूंसह खेळत होता कारण अमित रोहिदासला दुसऱ्या क्वार्टरमध्ये रेड कार्ड मिळाल्यामुळे तो संपूर्ण सामन्यातून बाहेर पडला होता. मात्र, भारतीय संघाने हार न मानता अखेरपर्यंत ब्रिटनला कडवी झुंज दिली. अशा प्रकारे भारतीय संघाने पदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. भारत उपांत्य फेरीत विजय मिळवण्यात यशस्वी ठरला, तर किमान रौप्यपदक निश्चित होईल. भारताचा उपांत्य फेरीचा सामना मंगळवार, ६ ऑगस्ट रोजी होणार आहे.
पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र त्यांचे गोलमध्ये रूपांतर कोणीही करू शकले नाही. यादरम्यान भारताचा गोलरक्षक पीआर श्रीजेशने दमदार कामगिरी करत ब्रिटनचे प्रत्येक आक्रमण रोखण्यात यश मिळवले. भारताने सलग तीन पेनल्टी कॉर्नर जिंकले, पण त्यांचे गोलमध्ये रूपांतर करू शकले नाही. भारताने ग्रुप स्टेजमध्ये चमकदार कामगिरी केली होती आणि आता संघाला बाद फेरीतही ही गती कायम राखावी लागणार आहे. भारतीय संघ हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरल्यास पदकाचा मानकरी ठरेल.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant