NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

‘विवाह’ विषयावर चीनमधील विद्यापीठात पदवी अभ्यासक्रम

‘विवाह’ विषयावर चीनमधील विद्यापीठात पदवी अभ्यासक्रम

बीजिंग - चीनमध्ये जन्मदर आणि विवाहदर कमालीचा कमी झाला आहे. यामुळे चीन सरकार चिंतेत आहे. आता चीनच्या ‘सिव्हिल अफेअर्स’ अर्थात नागरी व्यवहार विद्यापीठाने विवाह-संबंधित उद्योग आणि संस्कृती विकसित करण्यासाठी नवीन पदवीपूर्व ‘विवाह ‘ या विषयावर अभ्यासक्रम तयार केला आहे.पुढील महिन्यात सप्टेंबरपासून हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे.

बीजिंग येथील ‘सिव्हिल अफेअर्स’ विद्यापीठात सप्टेंबरमध्ये सुरू होणार्‍या या नवीन ‘विवाह ‘ विषयक अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत १२ प्रांतातील ७० पदवीपूर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात कौटुंबिक समुपदेशन,विवाहाचे नियोजन आदी विषयांचा समावेश आहे.

‘विवाह सेवा व व्यवस्थापन’ असे या अभ्यासक्रमाचे नाव आहे. चीनमध्ये विवाहाबाबत सकारात्मकता वाढावी व कुटुंब संस्था अबाधित राहावी यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. चीनमध्ये कोरोना काळानंतर उशिरा लग्न करण्याचे प्रमाण वाढले आहे. चीनमध्ये नोकर्‍या मिळत नसल्याने व जीवनमानाची खात्री नसल्याने अनेकांचा अविवाहित राहण्याकडे कल वाढत चालला आहे.


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट