मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

NASA अवकाशात प्रक्षेपित करणार कृत्रिम तारा

NASA अवकाशात प्रक्षेपित करणार कृत्रिम तारा

न्यूयॉर्क - जगभरातील देशांनी आणि अवकाश संशोधन संस्थांनी आजवर अवकाशात अनेक कृत्रिम उपग्रह सोडले आहेत. मात्र अद्याप कोणीही तारा अंतराळात कृत्रिम तारा प्रक्षेपित केला नव्हता. हे आव्हान आता NASA अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था पेलणार आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ आता या दशकाच्या अखेरीस एक कृत्रिम तारा प्रक्षेपित करण्याच्या तयारीत आहे. नासाने या मोहिमेला लँडोल्ट मिशन असे नाव दिले आहे.

या मोहिमेला खगोलशास्त्रज्ञ अर्लो लँडोल्ट यांचे नाव देण्यात आले आहे आणि ते २०२९ मध्ये प्रक्षेपित केले जाणार आहे. ‘नासा ‘ चा हा कृत्रिम तारा अमेरिकेच्या अवकाशात पृथ्वीपासून ३५,७८५ किलोमीटर अंतरावरच्या कक्षेत स्थापित केला जाणार आहे.फ्लोरिडा युनिव्हर्सिटीतील खगोलशास्त्राचे सहायक प्राध्यापक जेमी टेयर यांच्या मते, इतर ताऱ्यांभोवती परिभ्रमण करणाऱ्या ग्रहांवर महासागर अस्तित्वात आहेत की नाही आणि अशा ग्रहांवर जीवनाची उत्पत्ती होऊ शकते का, याचा या मोहिमेद्वारे शोध घेतला जाईल. या मोहिमेमुळे ताऱ्यांच्या सभोवतालची अशी ठिकाणे शोधता येतील, जिथे जीवसृष्टी असण्याची किंवा उगम होण्याची शक्यता आहे.याशिवाय हे मिशन एलियन्सच्या अस्तित्वासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे देऊ शकते.


रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट