BMW ची इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात दाखल
BMW ची इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात दाखल
मुंबई - जगप्रसिद्ध मोटर कंपनी BMW ने भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर क्षेत्रात धमाकेदार एन्ट्री करत CE 04 ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व वेगवेगळ्या सुविधांनी सज्ज असलेल्या या स्कूटरची एक्स शोरूम किंमत १४.९० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. सध्या ही स्कूटर सिंगल व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. ती इम्पिरियल ब्लू आणि फिकट सफेद रंगात खरेदी करता येणार आहे. या स्कूटरचं बुकिंग सुरू झालं आहे.
BMW CE 04 ची वैशिष्ट्ये
- या स्कूटरमध्ये असलेली इलेक्ट्रिक मोटर ३१ किलोवॅटचं आउटपूट देते. ४१ बीएचपी पॉवर आणि ६१ एनएम टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर २.६ सेकंदात ० ते ५० किमी प्रति तास वेग पकडू शकते, असं कंपनीचं म्हणणं आहे.
- या स्कूटरचा जास्तीत जास्त वेग १२० किमी प्रति तास आहे. यात राइड मोड, १०.२५ इंच टीएफटी आणि ट्रॅक्शन कंट्रोलसह इतर अनेक इलेक्ट्रॉनिक्स सुविधा आहेत.
- स्कूटरमध्ये ८.५ केडब्ल्यूएच बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी सिंगल चार्जवर १३० किमीची रेंज देते. बॅटरी चार्ज होण्यास ४ तासांपेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. चार्जिंगचा वेळ जास्त वाटत असल्यास कंपनी ग्राहकांना काही किंमत आकारून फास्ट चार्जर ऑफर करते. या चार्जरचा वापर केल्यास बॅटरी १ तास ४० मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकते.
- CE 04 च्या बॉडी पॅनेलला स्टायलिश डिझाइन देण्यात आलं आहे. स्कूटरची सीट बेंचसारखी आहे. एक लहान विंडस्क्रीन किंवा चाके आणि ऑफसेट मोनोशॉक सारख्या डिझाइन घटकांचा समावेश आहे.
- स्कूटर १५ इंचाच्या चाकांवर चालते. गाडीच्या दोन्ही टोकाला २६५ मिमीचा डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE