मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम

शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम 

अनिल परब यांचा विजय, भाजपच्या किरण शेलार यांचा पराभव; मुंबई पदवीधरमध्ये ठाकरे गटाचा डंका 

मुंबई पदवीधर मतदारसंघाला निकाल जाहीर 

- मुंबई पदवीधर मतदारसंघातून  अनिल परब यांचा 26 हजार 26 मतांनी विजय झाला. मुंबई पदवीधरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात लढत होती. मतदारांनी भाजपला नाकारलं असून उद्धव ठाकरेंवर पुन्हा विश्वास व्यक्त केल्याची प्रतिक्रिया वरून सरदेसाई यांनी म्हटलं आहे. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी 26 जून रोजी मतदान पार पडलं होतं.

अनिल परबांच्या विजयामुळे शिवसेना ठाकरे गटाला मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम राखण्यात यश मिळालं आहे. तर दुसरीकडे कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे यांचा विजय जवळपास निश्चित आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे रमेश किर हे उभे होते.


मुंबईत फक्त आमचंच चालणार

विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना अनिल परब म्हणाले की, हा विजय मी बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करतो. बाळासाहेबांचा आशीर्वाद असाच कायम राहू दे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी मी आभारी आहे.  माझ्या विजयासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीचे घटकपक्ष लढले त्यांचा आभारी आहे. 

मुंबई फक्त शिवसेनेचीच असल्याचं सांगत अनिल परब म्हणाले की, 'शिवसेना आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची' हे सिद्ध झालं आहे. मुंबईमध्ये शिवसेना आणि शिवसेनाच असणार, तीही उद्धव ठाकरेंची शिवसेना असणार. मुंबईचा मतदार हा शिवसेना उद्धव ठाकरेंच्या मागे उभार आहे. 

अनिल परब हे शिवसेनेचे विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करतात. महाविकास आघाडी सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली होती. उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ते रत्नागिरी जिह्याचे पालकमंत्रीही होते. अनिल परब हे 2012 आणि 2018 मध्ये विधानपरिषदेवर निवडून आले होते. त्यांना पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. 


रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट