ड्रग्ज तस्करी करणारा अटकेत
- by
- Aug 10, 2021
- 1114 views
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज ट्रॅफिकिंग नेटवर्क चालविणार्या ड्रग्ज तस्कराला नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने म्हणजेच एनसीबीने नवी मुंबईत कारवाई करत अटक केली आहे. स्टीफन सॅम्युअल टोनी असे या ड्रग्ज तस्कराचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून 102 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई करीत असताना टोनी याने एनसीबीच्या अधिकार्यांवर हल्ला केला. त्यात दोन अधिकारी जखमी झाले आहेत.
स्टीफन सॅम्युअल टोनी हा कोकेनचा पॅन इंडियात पुरवठा करत होता. कोलंबियाहून इथिओपिया मार्गे तो मुंबईत कोकेनच्या नेटवर्कमार्फत पुरवठा करण्यात महत्वाचा दुवा आहे. अलिकडेच तो कोकेनच्या पुरवठ्यासाठी दिल्लीहून मुंबईला आला होता. गेल्या काही महिन्यांपासून एनसीबी मुंबईचे अधिकारी त्याच्यावर पाळत ठेवून होते. त्याच्याकडे कोकेन असल्याची माहिती मिळाल्यावर नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर 30 येथे शुक्रवारी पहाटे कारवाई करुन स्टीफन टोनी याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न करुन अधिकार्यांवर हल्ला केला. त्यात दोन अधिकारी जखमी झाल्यानंतरही पोलिसांनी त्याला जेरबंद करीत त्याच्याकडून 102 ग्रॅम कोकेन जप्त केले.
शासकीय कर्तव्यात सरकारी अधिकार्यांना अडथळा आणल्याप्रकरणी स्टीफन सॅम्युअल टोनीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात येत आहे. एनसीबी मुंबईने अंमली पदार्थाच्या तस्करांविरोधात सातत्याने कारवाई केली असून 2021 मध्ये आतापर्यंत 22 परदेशी नागरिकांना अटक केली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya