मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

पनवेलचे अभिजीत पाटील मेड इन इंडिया आयकॉनचे मानकरी

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

पनवेल : मेड इन इंडिया आयकॉन 2021 या नामांकित पुरस्काराचा वाटप सोहळा राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे 20 जुलै रोजी संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या विशेष व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यावेळी पनवेलचे भूमिपुत्र अभिजीत पाटील यांना सामाजिक आणि पर्यावरणासाठीच्या केलेल्या कामाची दखल घेत त्यांना मेड इन इंडिया आयकॉन 2021 महाराष्ट्र सन्मान प्रदान करण्यात आला. 

गेली अनेक वर्षे राजकीय क्षेत्रातील अभ्यास, त्यानंतर उद्योग क्षेत्रात त्यांनी मारलेली उत्तुंग भरारी आणि हे सगळं करीत असताना नुकत्याच दीड महिन्यापूर्वी केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर  सदस्यपदी नेमणूक करण्यात आल्यामुळे अभिजित पाटील यांच्या अभ्यासू नेतृत्वाला खर्‍या अर्थाने न्याय मिळाला. हे सगळं होत असताना त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना येणार्‍या अडचणी संदर्भात पत्रव्यवहार करून पाठपुरावा देखील सुरू केला. आता त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत पनवेलचे भूमिपुत्र व भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य अभिजीत पाटील यांना सामाजिक आणि पर्यावरणासाठीच्या केलेल्या कामाची दखल घेत त्यांना मेड इन इंडिया आयकॉन 2021 महाराष्ट्र सन्मान प्रदान करण्यात आला. अभिजीत पाटील यांच्यासह गायक उदित नारायण, कुमार सानू, मराठी कलाकार स्वप्निल जोशी, भरत जाधव, प्रशांत दामले, उद्योगपती सौ लोढा, पोलिस अधिकारी यांनासुद्धा सन्मानित करण्यात आले.

तुर्भ्यातील पाटील बंधूंचाही सन्मान 
सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नवी मुंबईतील तुर्भे गावातील ग्रामस्थ डॉ.विनोद शंकर (बाबूशेठ) पाटील व डॉ.विजय शंकर पाटील ह्या जुळ्या बंधुना इंटरनॅशनल गिनीयस आयकॉन अचिव्हरस् अवॉर्ड - 2021 ह्या वर्षीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सुप्रसिद्ध गायक पद्मभूषण उदीत नारायण व सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेतारझा मुराद या मान्यवरांच्या हस्ते मुंबई येथे सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट