पनवेलचे अभिजीत पाटील मेड इन इंडिया आयकॉनचे मानकरी
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
पनवेल : मेड इन इंडिया आयकॉन 2021 या नामांकित पुरस्काराचा वाटप सोहळा राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे 20 जुलै रोजी संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या विशेष व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यावेळी पनवेलचे भूमिपुत्र अभिजीत पाटील यांना सामाजिक आणि पर्यावरणासाठीच्या केलेल्या कामाची दखल घेत त्यांना मेड इन इंडिया आयकॉन 2021 महाराष्ट्र सन्मान प्रदान करण्यात आला.
गेली अनेक वर्षे राजकीय क्षेत्रातील अभ्यास, त्यानंतर उद्योग क्षेत्रात त्यांनी मारलेली उत्तुंग भरारी आणि हे सगळं करीत असताना नुकत्याच दीड महिन्यापूर्वी केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर सदस्यपदी नेमणूक करण्यात आल्यामुळे अभिजित पाटील यांच्या अभ्यासू नेतृत्वाला खर्या अर्थाने न्याय मिळाला. हे सगळं होत असताना त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना येणार्या अडचणी संदर्भात पत्रव्यवहार करून पाठपुरावा देखील सुरू केला. आता त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत पनवेलचे भूमिपुत्र व भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य अभिजीत पाटील यांना सामाजिक आणि पर्यावरणासाठीच्या केलेल्या कामाची दखल घेत त्यांना मेड इन इंडिया आयकॉन 2021 महाराष्ट्र सन्मान प्रदान करण्यात आला. अभिजीत पाटील यांच्यासह गायक उदित नारायण, कुमार सानू, मराठी कलाकार स्वप्निल जोशी, भरत जाधव, प्रशांत दामले, उद्योगपती सौ लोढा, पोलिस अधिकारी यांनासुद्धा सन्मानित करण्यात आले.
तुर्भ्यातील पाटील बंधूंचाही सन्मान
सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नवी मुंबईतील तुर्भे गावातील ग्रामस्थ डॉ.विनोद शंकर (बाबूशेठ) पाटील व डॉ.विजय शंकर पाटील ह्या जुळ्या बंधुना इंटरनॅशनल गिनीयस आयकॉन अचिव्हरस् अवॉर्ड - 2021 ह्या वर्षीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सुप्रसिद्ध गायक पद्मभूषण उदीत नारायण व सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेतारझा मुराद या मान्यवरांच्या हस्ते मुंबई येथे सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya