मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

देहरंग धरण परिसरात पर्यटकांना आवर घाला

मनसेची तालुका पोलीसांकडे मागणी

पनवेल : पनवेल तालुक्यातील मालडुंगे ग्रामपंचायत हद्दीतील देहरंग धरण परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात फिरायला येत असतात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांच्यापासून स्थानिक नागरिकांना संसर्गाचा धोका निर्माण होवू शकतो. तसेच पर्यटक कोरोनाचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे देहरंग धरणाच्या परिसरात फिरायला येणार्‍या पर्यटकांना आवर घालण्याची मागणी मनसेचे विभाग अध्यक्ष विश्वास पाटील आणि उपतालुका अध्यक्ष दिनेश मांडवकर यांनी तालुका पोलिसांकडे केली आहे. 

 काही पर्यटक मद्यप्राशन करून चारचाकी वाहनातील म्युझिक सिस्टीम चालु करूज बेधुंदपणे गाण्यावर नाचत असतात व मद्यप्राशन करून बेजबाबदारपणे वाहने चालवतात. त्यामुळे या परिसरात बरेचसे अपघात घडतात. धरण परिसरात बरेचसे फार्म हाऊस अहेत. ते रात्री अपरात्री मद्यप्राशन करून गाण्याच्या आवाजावर जोरजोरात नाचणे चालू असते. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. काही अविवाहीत प्रेमीयुगल रात्री आठ-नऊ वाजेपर्यंत फिरत असतात. त्यामुळे अनुचित प्रकार घडु शकतात. धरण आणि धरणाच्या परिसरातील नद्यांमध्ये पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बर्‍याच पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे याठिकाणी येणार्‍या पर्यटकांवर बंदी घालण्याची मागणी मनसेचे विभाग अध्यक्ष विश्वास पाटील आणि उपतालुका अध्यक्ष दिनेश मांडवकर यांनी केली आहे. 

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट