पोलीसांना हुलकावणी देऊन पर्यटकांची हुल्लडबाजी
बंदोबस्त ठेवायचा तरी कुठेकुठे ; पोलिसही हतबल
पनवेल ः पावसाळा सुरु झाल्याने पर्यटकांना निसर्ग खुणावू लागला आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील धरण, धबधबे, नदी, डोंगरमाथांवर येणार्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर या पर्यटन स्थळांवर येण्यास बंदी घातली असून पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. तरीही ही बंदी झुगारुन, नियम धाब्यावर बसवून पोलीसांही हुलकावणी देऊन पर्यटक ठिकाणावर पोहचत असल्याने पोलीसही हतबल झाले आहेत. बंदोबस्त ठेवायचा तरी कुठेकुठे असा प्रश्न पोलीसांना पडला आहे.
लॉकडाउन शिथिल करण्यात आल्याने पर्यटकांची मोठी गर्दी गाढी नदीच्या परिसरात होताना दिसून येत आहे.पोलिसांचे दैनंदिन काम सुरू असून लॉकडाऊनचा बंदोबस्त देखील सुरू आहे. पावसाळा सुरू झाल्याने गाढेश्वर धरण, मोरबे धरण, माची प्रबळ याठिकाणी पोलिस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. नेरे-वाजे, मोरबे परिसरात येणार्या वाहनांची पोलीस कसून तपासणी करत आहेत. शेकडोंच्या संख्येने दुचाकी गाड्या, चारचाकी गाड्या धरणाच्या परिसरात फिरण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी येत आहेत. अनेक वाहनांना पोलीस आल्या पावली परत पाठवत आहेत. त्यामुळे पर्यटक चोरवाटा शोधून धरणाच्या परिसरात जातात. तर काहीजण शांतीवन-नेरे पाडा अशा नदीकिनारी निसर्गाच्या वातावरणात जाताना दिसून येत आहेत.
पर्यटकांची मोठी संख्या या परिसरात मौजमजा करण्यासाठी येत असल्याने कुठे कुठे बंदोबस्त ठेवायचा असा प्रश्न पोलिसांनी देखील पडला आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे व वाट मिळेल तिकडे पर्यटक नदीत जात असल्याने पोलीस देखील हतबल झाले आहेत. पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी बंदी घालण्यात आलेली असली तरीदेखील मद्याच्या नशेत काहीजण वाहन चालवत अपघाताला आमंत्रण देताना दिसून येत आहे. शनिवार-रविवारी वाहनांची संख्या प्रचंड वाढत असल्याने नवीन पनवेल, सुकापूर, आकुर्ली, नेरे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते. तसेच कोरोना सुरक्षा नियमांनाचीही यामुळे पायमल्ली होताना दिसत आहे. परिणामी कोरोना संक्रमण वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya