एक झाड माझ्या सत्यवानासाठी
जे एम म्हात्रे चॅरीटेबल संस्थेचा स्तुत्य उपक्रम
पनवेल : वटपौर्णिमा 24 जून रोजी असून यानिमित्ताने पनवेल मधील भगिनींसाठी जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने वडाचे छोटे रोपटे पूजनासाठी सोसायटी आणि सोसायटीच्या परिसरांमध्ये भेट म्हणून देण्याचा उपक्रम वटपौर्णिमेपर्यंत सुरू करण्यात आलेला आहे. कोरोनाचा काळ असल्याने आणि वडाच्या झाडाची वृक्ष तोड होऊ नये यासाठी एक झाड माझ्या सत्यवानासाठी, हा जे एम म्हात्रे चॅरीटेबल संस्थेचा स्तुत्य उपक्रम राबिवण्यात येत आहे.
वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात आणि आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मिळावे ही प्रार्थना करतात. परंतु सध्याचा कोरोना काळ पाहता पूजेच्या वेळी वडाच्या झाडाच्या ठिकाणी महिलांची गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होण्यास मदत होईल हे टाळण्यासाठी तसेच घरामध्ये पूजन करतेवेळी सदर वृक्षाची तोड करून वृक्षहानी ही मोठ्या प्रमाणात होते. या गोष्टी लक्षात घेऊन पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून पनवेलमधील भगिनींसाठी त्यांच्या जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने वडाचे छोटे रोपटे पूजनासाठी सोसायटी आणि सोसायटीच्या परिसरांमध्ये भेट म्हणून देण्याचा उपक्रम वटपौर्णिमेपर्यंत सुरू करण्यात आलेला आहे. भगिनींना आपल्या इमारतीच्या आवारातच सोसायट्यांमध्ये सदर रोपे देऊन पूजन करण्यासाठी आमच्याकडून एक पाऊल उचलण्यात आले आहे असे प्रितम म्हात्रे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya