पनवेलमध्येही दुकानांना दुपारी 2 पर्यंत परवानगी
पनवेल : ‘ब्रेक द चैन’ अंतर्गत राज्य सरकारच्या आदेशानुसार पनवेल महापालिकेसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आली आहेत. नव्या नियमांनुसार सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवता येतील.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव थोडासा कमी झाल्याने कडक निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत. सोमवारी मुंबई, ठाणे व नवी मुंबईमधील दुकाने दुपारी 2 वाजेपर्यंत खुली ठेवण्यात परवानगी देण्यात आली. मंगळवारी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी परिपत्रक काढून जिल्ह्यातील काही भागातील दुकानांसाठी नवी नियमावली सादर केली. यात पनवेलमधील दुकानांना सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु शनिवार, रविवार ती बंद राहतील. दुपारी 3 नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील. दरम्यान, यापूर्वी निश्चित केलेल्या आदेशाप्रमाणे होम डिलिव्हरी करण्यात परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय कोरोनाविषयक कामे करणार्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही 25 टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. कृषीविषयक दुकाने दुपारी 2 पर्यंत सुरु राहू शकतील. परंतु शनिवार, रविवार ही दुुुकाने सुरु ठेवण्यास परवानगी नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya