पोस्टाची प्रीमियम सेवा – २४ तासांत पोहोचणार पार्सल भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह देण्यासाठी कॅनडा सरकारने मागितले 35 लाख मुंबईतील पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग, मुख्य रस्ते व रहदारीचे रस्‍ते समतल करावेत, उप महापौर श्री. संजय घाडी 10 वी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला 10 वी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला 2026 चे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, या मराठी लेखकाचा सन्मान सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास सिंधू सेवा दलातर्फे शुक्रवारी (ता. २०) ‘चेटीचंड’ महोत्सव सक्तीने धर्मांतर विरोधी विधेयकावर विरोधी पक्षांमध्ये फूट बेकायदेशीर धर्मांतरणाच्या विरोधातील विधेयक सर्व धर्मियांसाठी समान…. Fastag वार्षिक पास १ एप्रिलपासून महागणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला स्थगिती आणि मनाई आदेश देण्याची मागणी आखाती देशातील युद्धामुळे टरबुज उत्पादक शेतकऱ्यांना फटका… राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर भारतीय चित्रपटांसाठी आता सबटायटल्स आणि ऑडिओ वर्णन अनिवार्य भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना व्हिसा मुदतवाढ LPG गॅसला पर्याय सापडल्याचा पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा गॅस पुरवठ्याच्या प्राधान्यक्रमाची नियमावली जारी अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांमुळे पादचारी हैराण पंधरादिवसांत राज्यातील मद्यनिर्मिती बंद करावी लागणार WhatsApp, FB आणि Messenger वर फसवणूक टाळण्यासाठी Meta चे नवे फिचर्स मुंबई मनपाच्या शाळांमध्ये मध्यान्ह भोजनाऐवजी फळे वाटप सक्तीच्या धर्मांतरासाठी ७ वर्षांची कैद, ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानसभेत सादर जागतिक महिला दिन मनाला स्पर्श करणारा उपक्रम ठरला LPG टंचाईमुळे इन्डक्शनच्या मागणीत मोठी वाढ ग्रामीण भागात 45 दिवसांनंतरच बुक होणार LPG सिलेंडर प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनांना ‘QR कोड’ अनिवार्य देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महाराष्ट्राचीच…. जप्तीची कारवाई सुरू होताच २ हजार ८८८ मालमत्ताधारकांनी भरला कर महाराष्ट्र केसरी २०२५-२६’ कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे झाले अनावरण मुंबईतल्या घरासाठी गिरणी कामगार एकवटला! मुरबे बंदर प्रकल्पाच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह बहुचर्चित ‘ लाडकी बहीण ‘ योजनेवर येतोय चित्रपट प्रसिद्ध रॅपर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबई येथे आगमन ‘हॉवर्थ इंडिया’तर्फे महिला दिनी कर्तृत्त्ववान महिलांसह प्रमुख शहरांमध्ये ‘गिव्ह टू गेन’ मालिकेचे आयोजन माणिकडोह मधील २० बिबट्यांचे वनतारा केंद्रात स्थलांतर अंबरनाथ शिवमंदिर परिसरात 32 घरांवर बुलडोझर हवामान विभागाकडून उष्णतेचा अलर्ट जारी ६० रुपयांनी वाढले घरगुती Gas सिलिंडरचे दर या शहरांत सुरू होणार BSNL 5G सेवा एकल मातांना पूर्ण पालकत्वाचा अधिकार – न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभदूत ॲपचे अनावरण बृहन्‍मुंबई महानगरपालिका स्‍थायी समिती अध्यक्षपदी श्री. प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड PCM ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळेल मेडिकलला प्रवेश शेअर बाजारात भीषण भूकंप! इराण-अमेरिका युद्धाच्या सावटाखाली बाजार ‘रक्तबंबाळ पंतप्रधानांच्या मेन्यूला अस्सल मराठी तडका ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी झाले रिलीज! DGCA कडून विमान प्रवासातील गैरवर्तनाबाबत; ‘झीरो टॉलरन्स पॉलिसी’ लागू अभिनेता प्रसाद ओकच्या कामगिरीचा विश्वविक्रम राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्चला निवडणूक नाशिकमधील द्राक्ष उत्पादक संकटात विमानात एवढं फ्यूएल घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय? जन गण मन आधी ‘वंदे मातरम्’ गाण्याला दल खालसाचा विरोध राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता काळाचौकी येथे खोदकामामुळे अपघातात वाढ हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ पुस्तकातून मार्गदर्शन आणि उपाय मस्क यांची AI कंपनी चंद्रावर उभारणार फॅक्टरी भोईवाडा परिसरात वाहतूक विभागाची धडक संयुक्त कारवाई; नगरसेविका श्रद्धा जाधव सोडवणार क्यू आर कोडने नागरी समस्या महाशिवरात्रीसाठी भीमाशंकर मंदिर राहणार बंद भारत लवकरच या देशात UPI लाँन्च करणार RSS च्या कार्यक्रमाला सलमान खानची उपस्थिती लाडक्या बहिणींच्या e-KYC ला मुदतवाढ १२ जिल्हापरिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान देशभर ओला, उबर आणि रॅपिडो चा संप इस्लामाबादमध्ये मशिदीवर आत्मघातकी हल्ला 31 जण मृत्यूमुखी, 169 जखमी भारतातील पहिला AI IPO करी रोड पदपथांवरील हायड्रेलमुळे पादचारी हैराण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना मिळणार Z+ दर्जाची सुरक्षा चेक बाऊन्स प्रकरणी अभिनेता राजपाल यादव विरोधात अटक वॉरंट शक्तिपीठ महामार्गाच्या खर्चात तब्बल १५ हजार कोटींची वाढ अजितदादा पवार यांचे संगमवाडी येथे भव्य स्मारक उभारण्याची मागणी युमनाम खेमचंद सिंह झाले मणिपूरचे 13 वे मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाची शपथ भायखळा येथे दिवंगत कै.शरद (आप्पा) पवार उद्यानाचे झाले लोकार्पण आज निर्मला सीतारमण नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार, मतदार यादीत नाव न सापडल्यास BMC च्या या हेल्पलाईनवर कॉल करा प्रचारतोफा थंडावल्या, उमेदवारांना घरोघरी प्रचारास मुभा राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका 5 फेब्रुवारीला Blinkit, Zepto, Swiggy, Zomato ची 10 मिनिटांची डिलिव्हरी सर्व्हीस बंद नालासोपार्‍यात १० लाखांची रोकड जप्त यामिनी जाधव यांचा मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रचाराला वेग राजुलच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे भांडुप मध्ये वेदांता समूहाचे अध्यक्ष दान करणार ७५ टक्के संपत्ती नाना आंबोले यांना शिवडीकरांचा वाढता प्रतिसाद ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध क्रांतिज्योती विद्यालय ‘ सुपरहीट, पहिल्याच आठवड्यात ३.९१ कोटी कमाई राज्यभरात प्रचारसभांचा धुरळा, फडणवीस ठाणेकरांशी संवाद ... मुंबईत धावणार 18 डब्ब्यांची लोकल राज्यातील २७ लाख वाहनांना अद्यापही HSRP नाही, लवकरच तपासणी होणार बिनविरोध निवडीला मनसेचा हायकोर्टात आव्हान माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचं दीर्घ आजारानं निधन वचन ठाकरेंचं! मुंबईकरांसाठी राज-उद्धव ठाकरेंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर आज होणार फैसला! कर्णधार वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका राजुल संजय पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज संरक्षण क्षेत्रासाठी 79 हजार कोटींच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी ३३ वर्षांनंतर पुन्हा उघडणार जेजे हत्याकांडाची केस प्रशिक्षकपदावरून गौतम गंभीरला बीसीसीआयकडून मिळणार डच्चू? अखेर BCCI ने सोडलं मौन, पुण्यात भाजप, राष्ट्रवादीविरोधात लढणार, मविआचा फॉर्म्युला ठरला; 50-50-50 मनसेलाही सोबत घेणार शिवसेनेची लवकरच पहिली यादी; एकनाथ शिंदेंकडून 60 माजी नगरसेवकांना संधी, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष टोलमाफी पास पर्यूषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने राहणार बंद २९ टक्के कोसळला या गेमिंग कंपनीचा शेअर Asia Cup मध्ये भारत-पाक आमने सामने- सरकारने दिली परवानगी 12 आणि 28 टक्क्यांचा GST स्लॅब होणार रद्द, सर्वसामान्यांना फायदा अमेरिकेत छत्रपती शिवरायांच्या कीर्तीरथाची भव्यदिव्य मिरवणूक कानात ईअर फोन असल्याने युवकाचा मृत्यू पोस्ट झाले अत्याधुनिक – अ‍ॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म सुरु BSNL ची मान्सून ऑफर – 1 महिना मोफत इंटरनेट गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक सलोख्यासाठी हजरत महंमद पैगंबर जयंती ८ सप्टेंबर रोजी होणार .. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रवासाला तब्बल बारा तास, मग टोल का द्यावा, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल उपमुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर केले ‘लाडकी सून’ अभियान मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी… कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ… उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच झाले सुरू मतदार यादीबाबतचे आरोप शपथपत्रासह करा अन्यथा माफी मागा… शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल १८ ऑगस्टला जालन्यात मुसळधार पावसाने नदी नाले तुडुंब… मुंबईत पागडीधारकांना आदित्य ठाकरेंकडून पुनर्वसनाची हमी कॅडबरी डेअरी मिल्कच्या रॅपरवर खास मराठीत शब्द पहिल्याच दिवशी FASTag वार्षिक पासला भरभरुन प्रतिसाद, १.४ लाखांहून अधिक नोंदणी राज्यात १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचे उद्घाटन लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत सर्व घटकांना सोबत घेऊन विकास करणार ! नारळी पौर्णिमेला वरळीत हुल्लडबाजी करणाऱ्या उबाठा गटावर कारवाई करा BSF मध्ये 1121 जागांसाठी भरती; 10वी-12वी व ITI करु शकतात अर्ज 15 ऑगस्टपासून सुरू होणार FASTag Pass गणेशोत्सव काळात मुंबईत ‘डीजे’ला बंदी दादरमध्ये इमारतीच्या छतावर कबुतरखाना सुरू आधार कार्ड, व्होटर कार्ड,रेशन कार्ड हे नागरिकत्त्वाचे पुरावे नाहीत 15 ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवलीत मांसाहार बंदी इथेनॉल पुरवठ्यात उ.प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी हेपेटायटीस D पासून कर्करोगाचा धोका असल्याचा WHO चा निर्वाळा दहिहंडी सराव करताना 11 वर्षीय बालकाने गमावला जीव अमेरिकेच्या टॅरिफमुळे दोन अब्ज डॉलरची कोळंबी निर्यात धोक्यात सिंचन तलाव धोक्यात; भिंत खचली, २०० एकर शेतीला धोका…. हुतात्मा स्मारकाच ऐतिहासिक महत्त्व टिकले पाहिजे - आमदार सचिन अहिर रेल्वेकडून इतर प्रवाशांसह मुंबईकरांसाठी सुरक्षेच्या नव्या उपाययोजना राजकीय पक्षाचा चेहरा राहिलेली व्यक्ति न्यायालयाचा चेहरा असणे योग्य आहे का ? सरकारने लोकसभेत सादर केलेले आयकर विधेयक घेतले मागे अमेरिकेच्या टॅरिफचा भारतीय वस्त्रोद्योगाला मोठा फटका ठाणे जिल्ह्यातील या शहरात लवकरच सुरु होणार ‘पॉड टॅक्सी’ सेवा माथेरानची हातरिक्षा बंद करा – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कबुतरांना अन्न-पाणी देण्यावर उच्च न्यायालयाची बंदी कायम एक पडदा सिनेमागृहाबाबत संयुक्त समिती कोल्हापूरकर जिंकले, महादेवी हत्तीण पुन्हा येणार नांदणी मठात उत्तराखंडला गेलेले महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुखरूप ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार, ४ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता भाजपाचे पदाधिकारी बनले न्यायाधीश, न्यायपालिकेचा निष्पक्षपणा धोक्यात? सेंचुरी मिलचा भूखंड कोणाच्या घशात घालणार? कामगार नेते गोविंदराव मोहिते‌ भायखळ्यात आमदार चषक 2025 ही भव्य हॉलीबॉल स्पर्धा संपन्न शिवसेना प्रभाग 205 च्या वतीने लाडू वाटप नृत्येश्वर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तैवानमध्ये भारतीय लोकनृत्यांची केली बहारदार सादरीकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाच्या नामकरणाविरोधात शिवसेनेचे आंदोलन एसटी आता करणार रिटेल (किरकोळ ) इंधन विक्री कबुतरांना खाद्य देणार्‍याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपामध्ये प्रवेश ‘$1 ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेकडे महाराष्ट्राची वेगवान वाटचाल! निवडणूक पारदर्शक होण्यासाठी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडा राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती… स्वामीनाथन यांचा जन्मदिन “शाश्वत शेती दिन” म्हणून साजरा राज्य सरकारने जाहीर केले नवे सोशल मीडिया नियम राज ठाकरे आल्यानं कित्येक पटीनं आनंद- उद्धव ठाकरे खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला गेला लाडकी बहीण योजनेसाठी 26.34 लाख महिला अपात्र जन्मतःच या बालकाच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी IB मध्ये नोकरीची मोठी संधी शाळा, कॉलेज आणि कोचिंग संस्थांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 15 निर्देश जारी मुंबई रेल्वे साखळी स्फोट प्रकरण : हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी ससून डॉकमधील मच्छीमारांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे.. ; राज ठाकरे निशिकांत दुबेवर कडाडले सीमाभागातील निपाणी शहरात कन्नड भाषेची सक्ती महायुती सरकारला सत्तेचा माज -माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई महाराष्ट्राचीच , मुंबईत मराठी माणसाचाच आवाज बुलंद …. ‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहांचे गुलाम म्हाडा लॉटरीचा धडाका; ठाण्यात 2000 घरांसाठी सोडत, वाचा कधी येणार जाहिरात पावसाळ्यात केस का गळतात? अशी घरगुती उपाय करून थांबवा केस गळती NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

तेनालीराम आणि तेल

भारत स्वतंत्र झाल्यापासून आखाती देशांतून तेल आयात करून आपली देशांतर्गत गरज भागवत आहे. त्यावर मात करण्यासाठी भारताने अणुऊर्जा, नैसर्गिक वायू पासून विद्युत निर्मिती, औष्णिक ऊर्जा आणि आता सोलर ऊर्जा वापरण्याचा व विकसित करण्याचा प्रयत्न गेल्या दोन दशकांपासून सुरु ठेवला आहे. त्याचबरोबर देशालगत असलेल्या विस्तीर्ण समुद्रातुन खनिज तेलाचे उत्खनन करून तेलाबाबत आत्मनिर्भर बनण्यासाठी गेली अनेक वर्ष केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. या तेल उत्खननावर  शेकडो कोटी रुपये केंद्रसरकार दरवर्षी खर्च करत असते. भारत सरकारन ओएनजीसी सारखी कंपनी स्थापून त्यामाध्यमातून गेली अनेकवर्ष भूगर्भातील तेल शोधून त्याचा उपसा कशा पद्धतीने करता येईल यासाठी हा प्रयत्नशील आहे. आपला देश विकसनशील असल्याने मोठ्या प्रमाणावर खनिज तेल, कोळसा, यासारख्या नैसर्गिक साधनसंपदेवर अवलंबून आहे. देशाचे परकीय चलन / गंगाजळी त्यासाठी खर्च होत असल्याने खूप मोठ्या प्रमाणावर भारत सरकारचेच तेल निघत असते. पण बुद्धिजीवी भाजप सरकार मधील तेनालीरामने या आपदेतूनही अवसर शोधला असून मोठ्या प्रमाणावर जनतेवर करवाढ लादून सर्वसामान्यांच्या खिशातूनच  तेल व नैसर्गिक गॅस काढण्याचा अभिनव प्रयोग देशात प्रथमच सुरु केला आहे.

उत्तर भारतात चतुर बिरबल आणि दक्षिण भारतात तेनालीराम यांच्या सुरस कथा त्यांच्या बुद्धी चातुर्याबद्दल प्रसिद्ध आहेत. आपली बाजू पडकी असली तरी कशा पद्धतीने समोरच्या व्यक्तीला पटवून द्यावी किंवा एकदम अडचणीच्या वेळी कशी वेळ मारून न्यावी हे या दोघांच्या बुद्धी चातुर्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या कथावरून शिकायला मिळते. आपल्या देशातही अशाच बुद्धिजीवी राजकीय तेनालीरामाच्या गोष्टी सध्या अनुभवायला मिळत आहेत. सध्या देशात तेल आणि गॅस यांच्या किमती कमालीच्या वाढत आहेत. गेल्या दोन महिन्यात स्वयंपाकाचा गॅस 225 रुपयांनी वाढला असून पेट्रोलने काही राज्यात शंभरी पार केली आहे. डीझेलही गेल्या वर्षभरात 26 रुपये प्रति लिटरने वाढले असून त्यामुळे अनेकांच्या व्यवसायांची गणिते चुकली आहेत. या वाढत्या दराबाबत प्रश्न विचारले असता या भाववाढीला केंद्र सरकार जबाबदार नसून आंतरराष्ट्रीय परिस्तिथी जबाबदार असल्याचे सरकार मधील तेनालीराम सांगत आहेत. मोदी, स्मृती इराणी, किरीट सोमय्या, रवी शंकर प्रसाद सारखे राजकीय नेते जेव्हा विरोधी पक्षात होते, तेव्हा त्यावेळच्या तेल दरवाढीवर व वाढत्या महागाईने जनतेच्या पोटाला पीळ पडतो म्हणून कांगावा करणारे वर्तन हि खरीच नौटंकी होती हे सत्तेत बसल्यावर त्यांनी महागाईबद्दल दिलेल्या सफाईवरून जाणवते. सत्ता मिळवण्याच्या हेतूने लोकांच्या भावनांचा बाजार अशापद्धतीने मांडता येतो हे त्यांनी देशवासियांना दाखवून दिले.  

सध्या जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर खूपच कमी असून त्याप्रमाणात भारतात मात्र हे दर विश्वविक्रमाला गवसणी घालत आहेत. भारताला प्रत्येक क्षेत्रात उंची गाठून देण्याचा ध्यास घेतलेल्या या बीजेपीच्या तेनालीरामाने आपल्या गोदी मिडिया माध्यमातून ते सध्या करण्याचा चंगच बांधला आहे. त्यामुळे भारत सध्या निरनिराळ्या क्षेत्रात कशा पद्धतीने मानांकन मिळवत आहे हे जगात प्रसिद्ध होणार्‍या निरनिराळ्या अहवालांवरून दिसून येत आहे. नुकतेच जगातील सर्वात महागडे पेट्रोल-डिझेल विकत घेणारी जनता हा अनेक मनाचा तुरा भारतीयांच्या शिरपेचात मोदींमुळे रोवला गेला आहे. त्यामुळे भारतीयांचीही छाती 56 इंचाने नक्कीच फुलली असेल. महागडे पेट्रोल डिझेल विकत घेणे म्हणजे जाज्वल्य राष्ट्रप्रेम, निस्सीम राष्ट्रभक्तीचा अंगीकार हि भावना भारतीयांच्या मनात ठसवण्यास भाजपचे तेनालीराम कमालीचे यशश्वी ठरल्याने, एवढे भाव वाढूनही जनता या भाववाढीला विरोध न करता त्याचा स्वीकार आपले प्राक्तन म्हणून करत आहे. महागडे तेल विकत घेऊन देशाच्या विकासाला आपण उलट हातभार लावत आहोत या भावनेत सध्या जनता असल्याने सध्यातरी विरोधकच या विरुद्ध बोलताना दिसत आहेत. आपल्या राज्यातील परिस्तिथीही फारशी वेगळी नाही, राज्यातील वाढत्या वीजबिलांविरुद्ध तेनालीराम बेंबीच्या देठांपासून आवाज उठवत असताना पद्धतशीरपणे  व जाणीवपूर्वक मात्र देशातील वाढत्या पेट्रोल-डीझेल दरांविरुद्ध मूग गिळून गप्प आहेत. कारण जर केंद्र सरकार विरुद्ध वाढत्या महागाई विरोधात आवाज उठवला तर तेथील तेनालीराम सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून कोठून धूर/गॅस काढतील  हे माहित असल्यानेच राज्यातील तेनालीराम हे मी पुन्हा कधी येईन या दिवा स्वप्नातच व्यस्त आहेत.

वाढत्या तेलाच्या दरांचा परिणाम आता अर्थव्यवस्थेवर जाणवू लागला आहे. दळणवळणाचे दर वाढू लागल्याने आता लोकांच्या जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढू लागले आहेत. तूरडाळीने पुन्हा शंभरी गाठली आहे तर कांदा पुन्हा गृहिणीच्या डोळ्यातून पाणी काढायला लागला आहे. रिक्षा आणि टॅक्सी यांच्या मुळ भाड्यात वाढ सरकारने केली आहे. मनमोहन सिंग सरकारच्या काळात डोक्यावर गॅस सिलेंडर घेऊन अभिनयाचे आंदोलन करणार्‍या स्मृती इराणी, पेट्रोल परवडत नाही म्हणून सायकल चालवणारे रवी प्रसाद, वाढत्या महागाईमुळे लोकांच्या कष्टावर प्रकाश पडणारे जावडेकर, भारताच्या रुपयाचे अवमूल्यन झाले आणि महागाई वाढली म्हणून तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना ढासळता रुपया आणि अर्थव्यवस्थेवर सल्ला देणारे विद्यमान अर्थतज्ज्ञ नरेंद्र मोदी या वाढत्या महागाई बद्दल ब्र ही काढायला तयार नाहीत. परंतु विरोधक कुठे काय शिंकला कि यावर मात्र सकाळ संध्याकाळ ट्विट करायला आणि प्रसार माध्यमांशी चर्चा करायला पुरेसा वेळ त्यांच्या कडे असतो, कारण प्रश्नही विचारणारे त्यांच्याच ओंजळीने पाणी पीत असल्याने महागाईबद्दल कोणीही प्रश्न विचारणार नाही याची त्यांना शाश्वती आहे.  

लोकांनी आम्हाला निवडून दिले म्हणजे आमच्या धोरणांना त्यांनी स्वीकारले असा समज सध्या तेनालीराम आणि गोदी मीडियाचा झालेला पाहायला मिळत आहे. मोदींच्या धोरणांना विरोध करणारा विरोधी पक्ष देशात का नको याचे गूढ आता हळू हळू उलगडू लागले आहे. भाजपच्या तेनालीरामाने देशातील मीडियाला हाताशी धरून आपल्याला हवे तेच लोकांना दाखवून लोकांच्या सारासार विचार करण्याच्या बुद्धीला छेद दिला. जर विरोधक देशात शिल्लक राहिला तर मात्र आपल्याला विरोध होऊ शकतो या भावनेने विरोधकांचे सरकारही पाडण्यात आले. परंतु गेल्या काही महिन्यांपासून देशातील चित्र हळू हळू बदलताना दिसत आहे. कोरोना संक्रमण नंतर गोर-गरिबांसाठी काही तरी पाऊले सरकार उचलेल अशी असलेली आशा धुळीला मिळाली आहे. पंतप्रधान मोदींना चुलीवर जेवण करणार्‍या महीलांचे दुःख पाहत नव्हते म्हणून ज्या कथित आठ कोटी महिलांना ‘उज्ज्वला योजने अंतर्गत गॅस सिलिंडर वितरित केला, त्या महिलांनी मोदींनी दिलेल्या श्रीमंतीला त्यागून पुन्हा आपल्या लाकडी चुलीचे वास्तव स्वीकारले आहे. रामराज्याचे स्वप्न विकणार्‍या तेनालीरामांच्या देशातील डिझेल-पेट्रोलचे दर  रावण आणि सीतेच्या देशापेक्षा हि महाग असल्याचे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी करून देशात रामराज्य आहे कि रावण राज्य आहे याचा विचार करण्याचे देशातील जनतेला अप्रत्यक्ष सुचवले आहे.

गेल्या 6-7 वर्षात सुमारे 23 लाख कोटी रुपये केंद्र सरकारने तेल दरवाढीतून कमावले आहेत. खरतर केंद्राच्या करातील रक्कमेच्या 40 टक्के रक्कम हि त्या-त्या राज्यांना द्यायची असते, पण ती देऊ लागू नये म्हणून बुद्धिजीवी तेनालीरामाने सेसच्या माध्यमातून करवाढ जनतेवर लादली आणि राज्य सरकारचेही अप्रत्यक्ष तेल काढले. गेले सहा वर्ष असेच तेल जनतेच्या खिशातून सरकार आणि खासगी कंपन्या तेल काढत असून त्याला कुठेतरी आळा बसणें गरजेचे आहे. एकतर आंदोलनाच्या माध्यमातून हे शक्य आहे किंवा सत्ता परिवर्तनाने हे शक्य आहे. आंदोलनाचा मार्ग सध्या कठीण वाटत आहे. जनतेला गृहीत धरणार्‍या तेनालीरामांचेच तेल काढण्याची वेळ मतदानाच्या माध्यमातून सध्या जनतेवर आली आहे. पुढील चार महिन्यात पांच  राज्यात निवडणुका असून तेनालीरामांच्या वक्तृत्व चातुर्याला बळी न पडत आपला मतदानाचा हक्क समर्पक रीतीने बजावल्यास अशक्य काहीच नाही नाहीतर पुढील पिढीला तेलीराम आणि तेली यांच्या सुरस कथा वाचायला मिळतील हे निश्‍चित.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट