नैनामध्ये अतिक्रमण विभागाची धडक कारवाई
पनवेल ः नैना विभागात अनधिकृतपणे बांधकाम करणार्यांविरोधात बुधवारी धडक कारवाई करुन सदर बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. आगामी काळातही बेकायदा बांधकामावर कारवाई होणार आहे. तसेच या अनधिकृत बांधकामांमध्ये घरे न घेण्याचे आवाहनही अतिक्रमण विभागाने केले आहे.
तालुक्यातील आकुर्ली गावाच्या हद्दीत नैना विभागात रस्त्याच्या मधोमध एक बांधकाम उभारण्यात आले होते. या बांधकामाविरोधात अतिरिक्त जिल्हाधिकारी खडके यांच्या मार्गदर्शनाखाली नैना अतिक्रमण विभागाचे सहा. नियंत्रक अनधिकृत बांधकामाचे अधिकारी गणेश झिने, खांदेश्वर पोलीस ठाण्याचे गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक ढाकणे, पोलीस अधिकारी कर्मचारी, सुरक्षा रक्षक, नैना अभियांत्रिक विभागाच्या राजूरकर आदींच्या पथकाने सदर विभागात ही कारवाई केली. यापुढेसुद्धा अशा प्रकारची बेकायदेशीर बांधकामे पाडण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
अनधिकृत बांधकामांमध्ये घर घेऊ नये. जेणेकरून नागरिकांची फसवणूक होणार नाही. नैना विभागाकडून येणार्या आगामी काळात अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई या विभागाचे प्रमुख खडके यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya