उरण येथे 1 हजार मेगावॅट वीज प्रकल्पाची गरज
ऊर्जामंत्री नितीन राऊत उरण विज प्रकल्पाला भेट
उरण : दोन आठवड्यापुर्वी दिवसभर मुंबई व उपनगरातील वीज अचानक खंडित झाली होती. त्यामुळे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे राज्यातील विज प्रकल्पांना भेट देऊन विज निर्मिती क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभुमीवर त्यांनी गुरुवारी उरण वायू विद्युत निर्मिती केंद्राला भेट दिली. या केंद्राची क्षमता कशी वाढविता येईल, याबद्दल सखोल चर्चा करण्यात आली.
मुंबईत पीक टाईमला सध्या वीजेची गरज 2500 मेगावॅट असते आणि 2030 ला ही गरज 5 हजार मेगावॅट असेल. तसेच 12 ऑक्टोबरला झालेली वीज बंद होण्याची घटना लक्षात घेता मुंबई आणि परिसरात वीज निर्मिती होणे गरजेची आहे. मात्र सध्या केवळ सर्व कंपन्याची मिळून केवळ 1300 मेगावॅट वीज निर्मिती होते. 12 ऑक्टोबरला मुंबई बाहेरून होणारा वीज पुरवठा ठप्प झाल्याने मुंबईतील आयलँडिंग यंत्रणा कोलमडली. मुंबई अंधारात गेली. ही घटना पुन्हा होऊ नये म्हणून विजेची क्षमता वाढवण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत राज्यातील सर्व विज प्रकल्पांना भेटी देत आहेत. या अंतर्गत त्यांनी उरण येथील गॅस थर्मल पॉवर स्टेशनची गुरुवारी पाहणी केली. या वेळेस त्यांच्यासमोर एक सादरीकरण करण्यात आले. या केंद्राची क्षमता कशी वाढविता येईल, याबद्दल यावेळेस सखोल चर्चा करण्यात आली. अधिकारी वर्गाबरोबरबैठक घेऊन या प्रकल्पात विजेची क्षमता वाढविण्यासाठी कोणत्या साधनांची कमतरता आहे यावर चर्चा करुन यासाठी कोणते प्रयत्न करावे लागतील याची महिती दिली. तसेच उरण येथे किमान 1 हजार मेगावॅटचा वीज प्रकल्प उभे करण्याची गरज आहे. त्यामुळे महाजनको कंपनीला असा प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे डॉ राऊत यांनी सांगितले. यावेळी राऊत यांच्या हस्ते प्रकल्पात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने राऊत यांची भेट घेऊन नोकरीपासून वंचित असणार्या प्रकल्पग्रस्तांना नोकर भरतीत सामावून घेणे तसेच विजेच्या समस्येपासून सुटका करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Hema Malini
- जन्मदिन
- October 16
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya