खवल्या मांजरांच्या खवलांची तस्करी करणारे 5 जण गजाआड
पनवेल : बेकायदेशीररित्या खवल्या मांजरांच्या खवलांची तस्करी करणार्या 5 जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून पनवेल व अलिबाग वनविभागाच्या पथकाने पकडले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खवल्या मांजरांची खवले हस्तगत केले आहेत. सदर आरोपींवर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.
खवल्या मांजरांच्या खवल्यांची तस्करी होणार असल्याची माहिती अशिष ठाकरे, (मा.उपवनसंरक्षक, अलिबाग) यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली डी.एस. सोनवणे. सहा. वनसंरक्षकाप्रादेशिक व वन्यजीव) पनवेल, पी.बी. मरले, वनक्षेत्रपाल (संरक्षण अतिक्रमण निर्मुलन), पनवेल व वनकर्मचारी यांचे समवेत मुंबई-गोवा महामार्गावरील मौजे-चिंचवण गावाचे हददीत सापळा रचून थांबले असता दोन मोटरसायकलवरून आरोपी ज्ञानेश्वर शिवकर व आरोपी प्रविण जाधव तसेच आरोपी प्रतिश भोस्लेकर हे आले. तर दुसर्या मोटरसायकलवर आरोपी प्रतिश भोस्लेकर आलेला दिसला. दरम्यान ते एकमेकांच्या पिशव्या आदलाबदल करत असताना वनविभागाच्या पथकाने सापळा रचून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघेजण त्यांच्या हाती सापडले तर एक जण पळून जात असताना पाठलाग करून त्याला पकडले असता त्यांच्याकडे प्राणी खवले मांजर या वन्यप्राण्याचे खवले असल्याचे दिसून आले असता ते जप्त केले. सदरच्या आरोपी विरुध्द गुन्हा नोंद केला. सदर आरोपींची चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सौरभ पाटील व आरोपी किरण पवार यांची माहिती दिली. त्यानुसार सहा. वनसंरक्षक, अलिबाग व वनक्षेत्रपाल (संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन), अलिबाग तसेच स्थानिक वडखळ वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी यांनी त्याचे राहत्या घरी जाऊन ताब्यात घेतले व त्यांनी दिलेल्या माहितीनुसार खवले मांजर या वन्यप्राण्याचे खवल्यांची भरलेली बॅग ज्या ठिकाणी टाकली होती ती जागा दाखवली सदर ठिकाणावरुन 3 किलो खवले मांजर वन्यप्राण्याचे खवले मिळून आले. तेसुद्धा ताब्यात घेतले असून सदर आरोपिंना प्रथम वर्ग न्यायालय, पनवेल यांचे न्यायालयात हजर केले असता न्यायायलाने त्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली. सदर गुन्हयांचा पुढील तपास चालू आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya