छात्रभारती विद्यार्थी संघटनेचा कॅण्डल मार्च
पनवेल ः छात्रभारती विद्यार्थी संघटना नवी मुंबई व मैत्री ग्रूप पनवेलच्या माध्यमातून पनवेलमध्ये कॅण्डल मार्च काढण्यात आला होता. 14 सप्टेंबर, 2020 रोजी हाथरस, उत्तरप्रदेश येथे मुलीवर 4 नराधमांनी बलात्कार, अमानुष छळ व मारहाण केला. पिडीत मुलगी हॉस्पिटलमध्ये 15 दिवस मृत्यूशी झुंज देत होती. अखेर 29 सप्टेंबर, 2020 रोजी तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. घडलेल्या घटनेचा छात्रभारती विद्यार्थी संघटना नवी मुंबईने कँडल मार्च काढत, हातात निषेधाचे पोस्टर्स घेत तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला व मेणबत्ती पेटवून पिडीतेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच तहसीलदार कार्यालय पनवेल व पनवेल शहर पोलीस ठाणे येथे जावून आरोपींवर तत्काळ कायदेशीर कार्यवाही करत योग्य ती कठोर शिक्षा करण्यात यावी असे निवेदन दिलेे. यावेळी छात्रभारती नवी मुंबईचे अध्यक्ष अजय कांबळे तसेच संघटनेचे सहकारी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya