2035 अखेर जगात ख्रिश्चनांपेक्षा मुस्लिमांची संख्या वाढणार
2035 अखेर जगात ख्रिश्चनांपेक्षा मुस्लिमांची संख्या वाढणार
मुंबई-: सध्या जगातील सर्वाधिक 62 टक्के लोकसंख्या असलेल्या ख्रिश्नन धर्माला इस्लाम पिछाडीवर टाकेल, असा अंदाज प्यू रिसर्च सेंटर या संस्थेने वर्तविला आहे. ही संस्था गेली 25 वर्षे धार्मिक लोकसंख्येचा सातत्याने अभ्यास करत आहे. प्यू रिसर्चने केलेल्या अभ्यासानुसार इस्लाम आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्मियांची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. मात्र त्यामध्ये इस्लाम धर्मीयांचा वेग अधिक आहे. याचे कारण म्हणजे इस्लाम धर्मियांमध्ये अधिकाधिक मुले जन्माला घालण्याची प्रवृत्ती आहे, असे प्यू रिसर्चच्या संशोधकांचे म्हणणे आहे.
प्यू रिसर्चचे संशोधक कॉनराड हॅकेट यांनी सांगितले की, धर्मांतर आणि अन्य माध्यमातून धार्मिक लोकसंख्या कमी जास्त होत असली तरी जास्त मुले जन्माला घालणे हेच इस्लाम धर्मियांच्या लोकसंख्यावाढीचे प्रमुख कारण आहे. नकाशाशोधा
2020 ते 2025 या कालावधीत मुस्लीम समाजात तीन अपत्यांचे प्रमाण होते. त्यापाठोपाठ ख्रिश्चन महिलांमध्ये 2 अपत्य एवढे प्रमाण होते. मात्र इस्लाम आणि ख्रिश्चन हे दोन धर्म वगळता जगातील अन्य प्रमुख धर्मिय महिलांमधील प्रजननाचा दर 1 एवढा आहे, असे प्यू रिसर्चच्या संशोधनातून आढळून आले आहे. भारतातही हिंदूंची लोकसंख्या वाढ कमी झाली आहे. महागाई, शिक्षण आणि स्वतःचे स्वातंत्र्य या तीन कारणांमुळे मूल जन्मास घालण्याकडे कल कमी होत चालला आहे.
परिणामी येत्या काही काळात भारतात मुस्लिमांची संख्या झपाट्याने वाढणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलिकडेच संघाच्या कार्यक्रमात हा मुद्दा व्यक्त करीत हिंदुंना तीन मुले असावी, असे आवाहन केले. मात्र त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद मिळाला नाही.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSWARAJ 19 NOV TO 25...
- 19 November, 2026
ADHARSWARAJ 19 NOV TO 25...
- 19 November, 2026
ADHARSWARAJ 19 NOV TO 25...
- 19 November, 2026
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Arjun Rampal
- जन्मदिन
- November 26
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर