WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी होतील तब्बल १,५०० सदस्य
WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी होतील तब्बल १,५०० सदस्य
मुंबई-: व्हॉट्सॲपने ग्रुपमधील सदस्यांची कमाल मर्यादा थेट १,५०० पर्यंत वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एकाच ग्रुपमध्ये आता तब्बल १,५०० जणांना सहभागी करता येणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी ॲडमिनला कोणत्याही सेटिंगमध्ये बदल करावा लागणार नाही. अँड्रॉइड आणि आयफोन युजर्सना हे अपडेट टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. व्हॉट्सॲपमधील नव्या बदलांची माहिती देणाऱ्या ‘वाबेटाइन्फो’ या संकेतस्थळाने सर्वप्रथम याबाबत वृत्त दिले. त्यानुसार, ग्रुपमधील सदस्यांची मर्यादा वाढवण्याची सुविधा अँड्रॉइड आणि आयओएस ( iOS) या दोन्ही प्रणालींवर उपलब्ध होत आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकारचे स्मार्टफोन वापरणाऱ्या युजर्सना आता मोठ्या संख्येने सदस्य असलेले ग्रुप तयार करता येतील. अँड्रॉइडओएस माहिती
नव्या अपडेटमधील महत्त्वाची बाब म्हणजे, ग्रुपची सदस्यसंख्या वाढवण्यासाठी ॲडमिनला कोणतीही विशेष प्रक्रिया करावी लागणार नाही. व्हॉट्सॲपकडून ही सुविधा आधीपासून अस्तित्वात असलेल्या ग्रुपमध्येही आपोआप लागू केली जात आहे. एखाद्या ग्रुपमध्ये आधीच १,०२४ सदस्य असतील, तर वाढीव मर्यादेचे अपडेट मिळाल्यानंतर त्यात आणखी ४७६ सदस्य जोडता येतील. म्हणजेच, जुन्या ग्रुपमधील सदस्यांना बाहेर काढण्याची किंवा नवीन ग्रुप तयार करण्याची गरज भासणार नाही.
व्हॉट्सॲपने गेल्या काही वर्षांत ग्रुपमधील सदस्यांची कमाल मर्यादा टप्प्याटप्प्याने वाढवली आहे. २०१६ मध्ये ही मर्यादा १०० वरून २५६ सदस्यांपर्यंत करण्यात आली होती. त्यानंतर ती ५१२ पर्यंत वाढवण्यात आली. पुढे २०२२ मध्ये व्हॉट्सॲपने एका ग्रुपमध्ये १,०२४ सदस्यांना जोडण्याची सुविधा दिली. आता पुन्हा एकदा मोठा बदल करत ही मर्यादा १,५०० पर्यंत नेण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSWARAJ 19 NOV TO 25...
- 19 November, 2026
ADHARSWARAJ 19 NOV TO 25...
- 19 November, 2026
ADHARSWARAJ 19 NOV TO 25...
- 19 November, 2026
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Arjun Rampal
- जन्मदिन
- November 26
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade