पवई तलावावर साकारणार म्युझिकल फाउंटन आणि मराठ्यांच्या शौर्यगाथा!
पवई तलावावर साकारणार म्युझिकल फाउंटन आणि मराठ्यांच्या शौर्यगाथा!
मुंबई- : मुंबईच्या पर्यटन वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार असून, पवई तलावाच्या सौंदर्यात भर घालणारा अत्याधुनिक म्युझिकल फाउंटन आणि लाईट अँड साउंड शो लवकरच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. सुमारे ३० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेला हा १८० मीटर लांबीचा म्युझिकल फाउंटन देशातील सर्वात मोठ्या फाउंटन्सपैकी एक ठरणार आहे. विशेष म्हणजे, या शोच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या पराक्रमाची गौरवगाथा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक भव्य आणि अद्भुत स्वरूपात सादर केली जाणार आहे. यामुळे मुंबईत एक नवे पर्यटन स्थळ विकसित होणार आहे. शहरशोधा
पवई तलाव येथील गणेश घाट येथे ‘लाईट, साउंड आणि संगीतमय कारंजे शो’ चा उद्घाटन सोहळा रविवारी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या म्युझिकल फाउंटनचे उद्घाटन होणार आहे. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मुंबई उपनगर जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला. म्हाडाच्या माध्यमातून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून, मुंबईच्या पर्यटन विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे.
या प्रकल्पांतर्गत जागतिक दर्जाचा मल्टिमीडिया लाईट अँड साउंड शो साकारण्यात येत आहे. यामध्ये म्युझिकल फाउंटन, वॉटर स्क्रीन आणि फायर जेट्स यांचा समावेश आहे. विशेष दृश्य परिणामांच्या (स्पेशल इफेक्ट्स) माध्यमातून तीन वेगवेगळे चित्रपट सादर केले जाणार असून, त्यामध्ये मराठ्यांचा देदीप्यमान इतिहास व पराक्रम, महाराष्ट्राची संस्कृती आणि वैभव तसेच मुंबईची गौरवशाली कहाणी उलगडणार आहे. या म्युझिकल फाउंटनमुळे तलावातील पाण्याचे एरेशन (Aeration) होण्यास मदत होणार असून, दररोज सुमारे ३० लाख लिटर पाण्यात हवा मिसळण्याची प्रक्रिया होईल. त्यामुळे पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत होऊ शकते. तसेच परिसरातील तापमान कमी होणे, बाष्पीभवनामुळे थंडावा निर्माण होणे आणि हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होणे असे संभाव्य पर्यावरणीय फायदे अपेक्षित आहेत. शहरशोधा
फाउंटनमध्ये अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, संपूर्ण यंत्रणा डिजिटल पद्धतीने प्रोग्राम करण्यात आली आहे. तब्बल ४० मीटर (१३० फूट) उंचीपर्यंत झेपावणारे वॉटर जेट्स आणि २७ फायर जेट्स हे या शोचे प्रमुख आकर्षण असणार आहेत. याशिवाय रनिंग फाउंटन चेसर्स, थ्रीडी स्विंग नॉझल्स आणि फॅन जेट्स यांमुळे पाण्याच्या विविध आकर्षक रचना साकारल्या जाणार आहेत. संगीताच्या तालावर नृत्य करणारे पाण्याचे कारंजे, आगीच्या ज्वाळा आणि वॉटर स्क्रीनवरील प्रोजेक्शन व लेझर प्रतिमा यांचा सुरेख संगम प्रेक्षकांना एक अविस्मरणीय दृक्-श्राव्य अनुभव देणार आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या पर्यटन स्थळ विकास निधीतून या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांनी म्हाडाची अंमलबजावणी संस्था म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानुसार प्रकल्पाचे आवश्यक आराखडे व मांडणी महानगरपालिकेकडे सादर करण्यात आली असून, महानगरपालिकेकडून ना-हरकत प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे. म्हाडा, महानगरपालिका आणि कंत्राटदार यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे. प्रकल्पाच्या संचालन व देखभालीसंदर्भातील तरतुदींची अंमलबजावणी संबंधित करारानुसार केली जाणार असल्याची माहिती म्हाडाच्या विद्युत विभागाने दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSWARAJ 19 NOV TO 25...
- 19 November, 2026
ADHARSWARAJ 19 NOV TO 25...
- 19 November, 2026
ADHARSWARAJ 19 NOV TO 25...
- 19 November, 2026
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Arjun Rampal
- जन्मदिन
- November 26
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर