गुलाबराव गणाचार्य बेटाची अद्ययावत दुरुस्ती करणार
गुलाबराव गणाचार्य बेटाची अद्ययावत दुरुस्ती करणार
मुंबई-नगरसेवक रोहिदास लोखंडे यांचे प्रतिपादन
स्वातंत्र्य आणि कामगार चळवळीतील उत्तुंग व्यक्तिमत्व माजी आमदार गुलाबराव गणाचार्य यांच्या बेटाची दुरुस्ती आणि सुशोभीकरण अध्ययवत करण्यात येईल असे जाहीर गौरवोद्गार नगरसेवक रोहिदास लोखंडे यांनी गुलाबराव गणाचार्य यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात केले. ते पुढे म्हणाले गुलाबराव गणाचार्य यांचे काम जनमानसात एवढे अप्रतिम होते की त्यांची आठवण काढल्याशिवाय कामगार चळवळ आणि स्वातंत्र चळवळ पूर्णच होऊ शकत नाही. गिरणी कामगारांचे न्याय हक्कासाठी त्यांनी लढा दिला आणि तो पूर्णत्वास नेला. त्यांचे हे स्मारक म्हणजे ही त्यांची आठवण आहे. ती नेहमीच युवा पिढीला प्रेरणा देईल.
गणाचार्य यांनी गिरणी कामगारांसाठी अनेक आंदोलने केली. आज घरांच्या माध्यमातून गिरणी कामगार मुंबईत टिकून राहिला आहे. त्यासाठी आम्ही राष्ट्रीय मिल मजदुर संघाच्या वतीने अनेक आंदोलने केली आणि यापुढेही कामगारांच्या न्याय हक्क आणि घरांसाठी आंदोलन करतच राहणार अशी माहिती राष्ट्रीय मिल मजूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी या अभिवादन कार्यक्रमात दिली. या कार्यक्रमांमध्ये कामगार नेते अनिल गणाचार्य यांनी कॉ. गुलाबराव यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील आठवणी सांगितल्या. सदर कार्यक्रमास पत्रकार नचिकेत पानसरे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे श्री. निवृति देसाई, अण्णा शिरसेकर, सुनील बोरकर नागपाडा वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. संतोष पाटील साहेब, बेस्ट व गिरणी कामगार श्रीमती अनुराधा प्रकाश रेडी- अध्यक्षा, मुंबई महिला फेडेरेशन अध्यक्षा व कम्युनिस्ट कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने का हजर होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSWARAJ 19 NOV TO 25...
- 19 November, 2026
ADHARSWARAJ 19 NOV TO 25...
- 19 November, 2026
ADHARSWARAJ 19 NOV TO 25...
- 19 November, 2026
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant