FDA ची नजर आता Gym मधील हेल्थ सप्लिमेंट्सवर
FDA ची नजर आता Gym मधील हेल्थ सप्लिमेंट्सवर
मुंबई: अन्न व औषध प्रशासन विभागाने आता हेल्थ सप्लिमेंट आहाराकडे आपला मोर्चा वळवला आहे. या पुढे हेल्थ सप्लिमेंटची विक्री करण्यासाठी एफडीएने घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. तसा आदेश एफडीने जारी केला आहे. एवढच नाही तर रोग बरा होतो असा दावा केला जातो किंवा डॉक्टरांनी शिफारस केलेले असे सादरीकरण किंवा इन्फ्यूएन्सर्स, व सोशल मीडियावर जाहिराती करणाऱ्यांवर कारवाई करणार असा कडक इशारा तुकाराम मुंढेंनी दिला आहे. तुकाराम मुंढेच्या आदेशानंतर अवैध मार्गाने हेल्थ सप्लिमेंटची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. नकाशेपहा
तुकाराम मुंढे म्हणाले, तरुण पिढीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या आहारपूरक म्हणजेच हेल्थ सप्लिमेंटची विक्री बाजारात होते. सध्या अशा प्रकारचे हेल्थ सप्लीमेंट हे मेडिकल स्टोअर्सपासून ते व्यायामशाळेपर्यंत सर्वत्र विकले जाते. पण आता एफडीएच्या नियमांचं पालन करुनचं अशा प्रकारची विक्री करता येणार आहे. जिम, फिटनेस आणि औषधलयात जिथे हे विकलं जात असेल तर त्यांच्याकडे परवाना म्हणजे फूड लायसन्स असंण गरजेचं आहे.
तुकाराम मुंढे म्हणाले, आजार बरा करणे…वजन कमी करणे अशा गोष्टी सांगितल्या जातात. हेल्थ सप्लिमेंट्स हे नेहमीच्या आहारास पूरक असतं, कमतरता बरी करण्यासाठी याचा वापर होऊ शकत नाही. न्यूट्रास्युटिकल्सचं कामं आरोग्य आहे तसं ठेवण्यासाठी आहे. चुकीच्या पद्धतीने जाहिरात केली जाते. लेबलवर सविस्तर माहिती देणं आवश्यक आहे. मुलांपासून दूर ठेवा… रोज वापर टाळा हे लिहिणं महत्वाचं असून वापरलेल्या घटकांचे परिणाम आणि दुष्परिणाम देखील लिहायला हवं… इनफ्लून्सरने चुकीची जाहिरात केली तर 10 लाखापर्यंत दंड आणि परवाना नसेल तर 10 लाख दंड ठोठावण्यात येणार आहे जर कुणी यामुळे जीव गमावला तर आजन्म करावासाची शिक्षा सुनावण्यात येईल.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSWARAJ 19 NOV TO 25...
- 19 November, 2026
ADHARSWARAJ 19 NOV TO 25...
- 19 November, 2026
ADHARSWARAJ 19 NOV TO 25...
- 19 November, 2026
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant