ओबीसींप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही मिळणार शुल्क सवलत
ओबीसींप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही मिळणार शुल्क सवलत
मुंबई -: “शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, ही शासनाची भूमिका आहे. मराठा समाजातील पात्र विद्यार्थ्यांनाही ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे,” असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. नकाशेपहा
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजातील पात्र विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक व विविध शुल्क सवलती देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबत कृषी विभागाने २० नोव्हेंबर २०२६ रोजी शासन परिपत्रक जारी केले आहे.
या निर्णयानुसार पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कासह प्रवेश शुल्क, ग्रंथालय शुल्क, जिमखाना शुल्क, नोंदणी शुल्क, विद्यार्थी सहाय्य व कल्याण निधी, विमा निधी, महाविद्यालयीन मासिक शुल्क, वैद्यकीय मदत निधी आणि विद्यार्थी ओळखपत्र शुल्क अशा विविध शुल्कांमध्ये सवलत मिळणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. लाभ देताना शासनाने निश्चित केलेल्या पात्रतेच्या निकषांची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश चारही कृषी विद्यापीठांना देण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांना आवश्यक समन्वय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नकाशेपहा
या निर्णयामुळे मराठा समाजातील पात्र विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणावरील आर्थिक भार कमी होऊन त्यांना उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होतील. ग्रामीण व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. असेही दत्तात्रय भरणे म्हणाले
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSWARAJ 19 NOV TO 25...
- 19 November, 2026
ADHARSWARAJ 19 NOV TO 25...
- 19 November, 2026
ADHARSWARAJ 19 NOV TO 25...
- 19 November, 2026
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर