पंतप्रधान मोदींचा फोटो हटवल्याने अमित ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल
पंतप्रधान मोदींचा फोटो हटवल्याने अमित ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल
पुणे-: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यावर आज पुण्यातील महाविद्यालय मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अमित ठाकरे यांच्यासहित २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांचा फोटो महाविद्यालयाच्या कार्यालयातून हटवल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता. भाजप कार्यकर्त्यांच्या आक्षेपानंतर अमित ठाकरे यांच्यासह इतर २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या कँटीनची पाहणी केली. यावेळी शासकीय कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावल्याचे दिसल्यानंतर अमित ठाकरे चांगलेच संतापले. काढ रे तो फोटो, असे आदेश त्यांनी कार्यकर्त्याला दिले. कार्यकर्त्याने देखील पुढच्या मिनिटभरात शिवाजी महाराजांशेजारी असलेला पंतप्रधान मोदींचा फोटो काढला. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. चतुश्रुंगी पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास अमित ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अमित ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे तक्रार ?
नेहमीच्या वेळाप्रमाणे शासकीय तंत्रनिकेतन, गणेशखिंड पुणे येथे प्राचार्य म्हणून कर्तव्यावर असताना, दुपारी १२ वाजताच्यासुमारास, महाराष्ट्र नवर्निमाण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आणि त्यांच्यासोबत २० ते २५ पदाधिकारी, विद्यार्थी, कार्यकर्ते हे आमची भेट घेण्यासाठी आमच्या पूर्व परवानगीशिवाय आमच्या कॉलेजच्या प्रशाकीय ऑफिसमध्ये आले होते. त्यावेळी अमित राज ठाकरे हे आमचेसोबत विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील आणि मेसमधील, स्वच्छतागृहातील अस्वच्छता याबाबत आम्हाला जाब विचारून मोठा आवाजात धमकीवजा सूचना देत होते.
त्यावेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी कोणीतरी अनोळखी कार्यकर्त्यास अमित ठाकरे यांनी आमच्या ऑफिसमध्ये आमच्या उजव्या बाजूकडील भिंतीवर लावलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांचा फोटो बघितला आणि त्यांच्या कार्यकर्त्याल फोटो काढावयास सांगितला. पंतप्रधान यांचा फोटो काढण्यास सांगितले असता त्या गोष्टीस मी विरोध केला असता त्यांनी आमच्याशी उद्धटपणे वागणुक करून फोटो जबरदस्तीने काढून घेतला. तसेच आमच्या ऑफिसमध्ये विनाकारण थांबून जोरजोरात मनसे जिंदाबाद, महाराष्ट्र नवर्निमाण विद्यार्थी सेनेचा विजय असो अशा घोषणा दिल्या. तसेच आम्ही दिलेल्या सुचनांची पुढील आठ दिवसात पूर्तता केली नाही तर, आम्ही पुन्हा तुमच्या कार्यालयात येऊन आंदोलन करु अशी धमकी दिली, अशी तक्रार प्राचार्यांनी दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर