खासदार संजय दिना पाटील यांच्या निधीतून साकारले शहीद जयवंत पाटील उद्यान.
खासदार संजय दिना पाटील यांच्या निधीतून साकारले शहीद जयवंत पाटील उद्यान.
मुंबई-: लाल बहादुर शास्त्री, कांजुरमार्ग येथील शहीद जयवंत पाटील उद्यानाच्या सौंदर्यीकरण कामाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. खासदार संजय दिना पाटील यांच्या पुढाकारातून आणि खासदार निधीतून साकारलेल्या या सुशोभीकरणामुळे परिसरातील नागरिकांना प्रशस्त, स्वच्छ व सुंदर विरंगुळ्याची जागा उपलब्ध झाली आहे.
रविवारी रात्री झालेल्या उद्घाटन सोहळ्याला खासदार संजय दिना पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून उद्यानाची पाहणी केली. उद्यानामध्ये करण्यात आलेली विविध विकासकामे, नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा तसेच लहान मुलांसाठी उभारण्यात आलेली खेळाची साधने याची त्यांनी पाहणी केली. यावेळी आमदार अशोक पाटील, प्रभाग समिती अध्यक्षा साक्षी वळवी, नगरसेविका जागृती पाटील, दत्ता दळवी, धनंजय पिसाळ व दीपक दळवी यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कांजुरमार्ग परिसरात नागरिकांसाठी मोकळ्या आणि मनोरंजनाच्या जागांची गरज सातत्याने जाणवत होती. ही गरज लक्षात घेऊन शहीद जयवंत पाटील उद्यानाचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. या कामामुळे उद्यानाचा चेहरामोहरा बदलला असून नागरिकांना सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांना निवांत बसून गप्पा
मारण्यासाठी एक चांगली जागा उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर लहान मुलांना खेळण्यासाठीही उद्यानात चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
उद्घाटनानंतर लहान मुलांनी उद्यानातील खेळाच्या साहित्याचा मनमुराद आनंद घेतला. उद्यान नागरिकांसाठी खुले होताच परिसरातील मुलांनी आणि पालकांनी येथे मोठी गर्दी केली. त्यामुळे हे उद्यान भविष्यात परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचे विरंगुळ्याचे ठिकाण ठरणार असल्याचे चित्र पाहायला मिळाले. खासदार संजय दिना पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील मूलभूत सुविधांबरोबरच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न आणि परिसराच्या सुशोभीकरणाला देखील सातत्याने प्राधान्य दिले आहे. रस्ते, वाहतूक, सार्वजनिक सुविधा, उद्याने तसेच नागरिकांना आवश्यक असलेल्या विविध विकासकामांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. खासदार निधीचा उपयोग नागरिकांच्या प्रत्यक्ष गरजा पूर्ण करणाऱ्या कामांसाठी व्हावा,
यासाठी त्यांचा प्रयत्न राहिला आहे. शहीद जयवंत पाटील उद्यानाचे सौंदर्यीकरण हे त्याच विकासदृष्टीचे आणखी एक उदाहरण असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. केवळ मोठ्या प्रकल्पांपुरता विकास मर्यादित न ठेवता परिसरातील नागरिकांना दररोज उपयोगी पडणाऱ्या सुविधा निर्माण करण्यावर खासदार संजय दिना पाटील यांनी भर दिल्याचे यावेळी नागरिकांनी नमूद केले. उद्यानाचे सौंदर्यीकरण पूर्ण करून ते नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी खासदार संजय दिना पाटील यांचे आभार मानले. आपल्या परिसरातच मुलांना खेळण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी चांगली जागा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade