शिवडी क्षयरोग रुग्णालयात डास-मच्छर व झुरळांचा उपद्रवरुग्णांना होतोय मानसिक त्रास
शिवडी क्षयरोग रुग्णालयात डास-मच्छर व झुरळांचा उपद्रवरुग्णांना होतोय मानसिक त्रास
मुंबई-शिवडी येथील सदर क्षयरोग रुग्णालयातील काही रुग्णांनी रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात डास, मच्छर व झुरळांचा वावर असल्याची तसेच अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे रुग्णांना त्रास होत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत महलत महिला मंडळाच्या अध्यक्षा वैशाली गावडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह रुग्णालयाची पाहणी केली.
पाहणीदरम्यान रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्था, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा तसेच वैद्यकीय अधिकारी, सफाई कर्मचारी आणि अन्य कर्मचाऱ्यांकडून रुग्णांशी करण्यात येणारी वागणूक समाधानकारक असल्याचे निदर्शनास आले. मात्र, डास, मच्छर आणि झुरळांचा उपद्रव असल्याची रुग्णांची तक्रार प्रत्यक्ष पाहणीतही काही प्रमाणात सत्य असल्याचे आढळून आले.
यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी या समस्येबाबत चर्चा करण्यात आली. रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा विषय गांभीर्याने घेऊन तातडीने पेस्ट कंट्रोलची कार्यवाही करण्यात येईल आणि डास-मच्छर व झुरळांचा उपद्रव कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन वैद्यकीय अधिकारी अनिश नवले यांनी दिले.
रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे रुग्णांच्या तक्रारींकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन स्वच्छता व कीटक नियंत्रणाची नियमित व्यवस्था कायम ठेवावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
या टीबी रुग्णालयाच्या बाबतीत अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या असून त्यानुसार मी महापालिका प्रशासनाला येथे पेस्टिसाइड कंट्रोल करण्याच्या तसेच उंदीर पकडण्याच्या सूचना दिल्या असून लवकरच यावर कारवाई होईल आणि रुग्णांना दिलासा मिळेल अशी माहिती स्थानिक नगरसेविका इरम सिद्धीकी यांनी दिली.
या पाहणी दौऱ्यावेळी समाजसेविका वैशाली गावडे यांच्यासह महिला मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकारी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade