१२ ऑगस्टच्या खग्रास सूर्यग्रहणाचा प्रभाव; देशात मोठ्या घडामोडींचे संकेत
१२ ऑगस्टच्या खग्रास सूर्यग्रहणाचा प्रभाव; देशात मोठ्या घडामोडींचे संकेत
जितेश सावंत : या वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण (Solar Eclipse) दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी होणार असून, रात्री 09:04 वाजता सुरू होईल आणि १३ ऑगस्ट रोजी ०१.२८ मिनिटांनी संपेल वाजता संपेल.
ह्या ग्रहणाचा कर्क राशी आणि आश्लेषा नक्षत्रावर अधिक प्रभाव दिसेल.
12 ऑगस्ट 2026 रोजी होणारे सूर्यग्रहण विशेष मानले जात आहे. हे खग्रास म्हणजेच पूर्ण सूर्यग्रहण असून, या काळात चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकणार आहे. त्यामुळे ग्रहणाच्या पट्ट्यात दिवसाच्या वेळी काही काळ अंधारासारखे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
हे खग्रास सूर्यग्रहण स्पेन, पोर्तुगाल, आइसलँड, ग्रीनलँड आणि रशियाच्या काही भागांतून पाहता येणार आहे. तर ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, इटली , युरोपचा बहुतांश भाग,आणि उत्तर आफ्रिकेतील,उत्तर अमेरिकेच्या काही भागांत खंडग्रास म्हणजेच अंशतः सूर्यग्रहण दिसेल.
ह्या ग्रहणाच्या पत्रिकेचा विचार केला असता.
संपूर्ण जगाला नैसर्गिक संकटांशी सामना करावा लागेल. मोठे भूकंप, वादळे, समुद्रातील वादळे,जलमृत्यू ,जलप्रलय होतील. रोग्यांच्या साथी पसरतील.
देशाचा खर्च वाढणार, आर्थिक स्थिती बिघणार,कर्जाचा डोंगर वाढणार,चलनात घट, चलनात बदल होतील, नवीन चलन अस्तित्वात येईल, कर वाढतील, श्रीमंत लोक,उद्योगपती यांच्या साठी प्रतिकूल, काही धंद्यांचे दिवाळे वाजेल, बँकांसाठी प्रतिकूल, धनिक लोकांचे मृत्यू , शेअर बाजारात मोठ्या आणि भयंकर घडामोडी ,प्रचंड अस्थिरता.
देशाचे सैन्य/आरमार यातील खर्चात वाढ होईल. उद्योधंद्यात मंदी येईल. कारखानदार,ज्येष्ठ व्यक्ती,राजकारणी यांना तुरुंगवास घडण्याची शक्यता. परदेशातील कटकटी वाढतील, देशातील अधिकाऱ्यांवर आरोप होतील त्यांच्या अब्रूवर शिंतोडे उडतील. मित्र राष्ट्रांशी संबंध बिघडतील. देशाच्या बॉर्डरवर समस्या उत्पन्न होतील.
विरोधी पक्षा करिता चांगला काळ. विरोधी पक्ष बलवान होणार. विरोधी पक्षाच्या मनासारख्या घटना घडणार. विरोधी पक्षाचे बोलणे प्रभावी राहील.
महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळात मोठ्या घडामोडी /मोठे बदल ( दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या सूर्यग्रहणाच्या पोस्ट मध्ये देखील मी हे नमूद केले होते,
जमीन मालक, खाण मालक यांच्या करिता उत्तम काळ. नवीन सार्वजनिक/इमारती,रस्ते,मोठी घरे,बिल्डींग्स या संदर्भातील प्रोजेक्टना चालना.
रस्त्यावरील/ रेल्वे अपघातात वाढ. प्रसारमांध्यमांसंबंधी वादविवाद वाढतील, वृत्तनिवेदक/अँकर अडचणीत खेळाडूंना स्पर्धेत चांगले यश.संमेलनात वाद निर्माण होतील.
रोगराई,चोऱ्यामाऱ्या,बेकारी यांचे प्रमाण वाढेल.
स्त्री कलाकारांसाठी प्रतिकूल,आजारी पडतील, त्यांच्यावर आरोप होईल, गुन्हे दखल होतील, स्कँडल /अश्लील प्रकार बाहेर येतील.विषबाधेचे प्रकार घडतील
संचालक, विश्वस्त याना तुरुंगवास, गुन्हेगार पलायन (पळून जातील) करतील
सिनेमागृह तसेच खेळाची मैदाने यात हिंसा आणि भय किंवा आतंक वाढेल
विमान प्रवासात खंड, हॉस्पिटल मध्ये माऱ्यामाऱ्या, संप, वैमानिक ,विमान कर्माचारी यांचे संप, ज्येष्ठ व्यक्ती काही प्रकरणात अडकणार.
मगर.सुसर, कासव अश्या जलचर प्राण्यांना त्रास.
सोने,चांदी,इतर धातू ,गूळ,हळद,धने,जिरे,मूग,चणे,गहू सूत ,रुई,तेल,तूप यात येणाऱ्या काळात ३/५ महिन्यानंतर तेजीं निर्माण येईल.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade