शहीद लोबगा रांगजेन यांच्या स्मरणार्थ तिबेटी युवा काँग्रेसचे जागतिक आंदोलन
शहीद लोबगा रांगजेन यांच्या स्मरणार्थ तिबेटी युवा काँग्रेसचे जागतिक आंदोलन
मुंबई-शहीद लोबगा रांगजेन यांच्या स्मरणार्थ तिबेटी युवा काँग्रेसने (TYC) जगभर साखळी आंदोलन (Chain Protest) सुरू करण्याची घोषणा सीएसटी येथील आझाद मैदान येथून केली आहे. धर्मशाला येथून या आंदोलनाची सुरुवात होत असून, जगभरातील तिबेटी युवा काँग्रेसच्या शाखा आणि समर्थकांच्या सहभागातून उपोषणे, निदर्शने, मेणबत्ती मोर्चे, जनजागृती मोहीम, सार्वजनिक सभा आणि शांततापूर्ण आंदोलनांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक तिबेटी युवा काँग्रेस, भंडारा शाखेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.
निवेदनानुसार, शहीद लोबगा रांगजेन यांनी तिबेटच्या प्रश्नाकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधण्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आणि तिबेटी जनतेच्या प्रश्नांवर जागतिक स्तरावर जनमत तयार करण्यासाठी हे आंदोलन राबविण्यात येणार आहे.
तिबेटी युवा काँग्रेसने चीनने लागू केलेल्या तथाकथित “एथनिक युनिटी लॉ”ला तीव्र विरोध दर्शविला आहे. हा कायदा तिबेटी भाषा, संस्कृती, धर्म आणि राष्ट्रीय ओळख कमकुवत करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. तिबेटसह अन्य प्रदेशांतील स्थानिक समाजाचे जबरदस्तीने आत्मसातीकरण करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
संघटनेने संयुक्त राष्ट्रसंघाला तिबेटमधील मानवाधिकारांच्या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. तसेच तिबेटमधील कथित दडपशाहीबाबत चीनला जबाबदार धरणे, सर्व तिबेटी राजकीय कैद्यांची बिनशर्त सुटका करणे आणि तिबेटी जनतेच्या हक्कांचा सन्मान करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीसांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी तिबेटचा उल्लेख “अल्पसंख्याक” म्हणून केल्याच्या कथित वक्तव्यावरही तिबेटी युवा काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तिबेटची स्वतंत्र ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय ओळख असल्याचा दावा संघटनेने पुन्हा एकदा मांडला आहे.
शहीद लोबगा रांगजेन यांचे बलिदान हे संघर्षाचा शेवट नसून न्याय, स्वातंत्र्य आणि तिबेटी जनतेच्या हक्कांसाठीच्या लढ्याची नव्याने सुरुवात असल्याचे संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर