EWS गटासाठी CIDCO ची 4779 सदनिकांसाठी लॉटरी
EWS गटासाठी CIDCO ची 4779 सदनिकांसाठी लॉटरी
नवी मुंबई-: सिडको लवकरच 4779 घरांसाठी बंपर लॉटरी काढणार आहे. खारघर, कळंबोलीसह नवी मुंबईच्या प्राईम लोकेशनला सिडकोचा मोठा प्रोजेक्ट असणार आहे. खास EWS गटासाठी ही घरं असणार आहेत. सिडको महामंडळाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अर्थात ईडब्ल्यूएस गटासाठी 4779 सदनिकांची नवीन गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता www.cidcohomes.com या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी सुरू होणार. या योजनेअंतर्गत तळोजा सेक्टर-39 येथे 4,229, कळंबोली बस डेपो येथे 257 आणि खारघर बस डेपो येथे 293 सदनिका उपलब्ध केल्या जाणार आहेत.
योजनेतील काही सदनिका दिव्यांग अर्जदारांसाठी राखीव आहेत. प्रत्येक प्रकल्पाची सदनिकानिहाय किंमत व सर्व इतर शुल्क नोंदणी सुरू होण्यापूर्वी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाखांपर्यंत असलेले व भारतात कुठेही पक्के घर नसलेले अर्जदार या योजनेसाठी पात्र आहेत. सविस्तर पात्रता निकष व अटी पोर्टलवर उपलब्ध आहेत.
तळोजा, कळंबोली व खारघर हे नोड्स विस्तृत रस्ते जाळे, रेल्वे-मेट्रो कनेक्टीव्हिटीने सुसज्ज आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अगदी जवळ आहे. यामुळे हे सर्व नोड उत्तम दळणवळणाने जोडलेले आहेत. सदनिकांचे वाटप हे पात्रता पडताळणी, कागदपत्रांची छाननी व योजनेच्या अटी-शर्तींच्या पूर्ततेच्या अधीन आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर