कामगारांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाची 17 ऑगस्टपासून निदर्शने.
कामगारांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाची 17 ऑगस्टपासून निदर्शने.
मुंबई-भारतीय मजदूर संघाचे वतीने कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नाबाबत सरकारकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि वारंवार आश्वासने देऊनही पूर्ण करणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी 17 ऑगस्ट रोजी देशभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहे.
21 नोव्हेंबर 2025 रोजी नवीन कामगार कायदे लागू करण्यापूर्वी व त्यानंतर वेळोवेळी भारतीय मजदूर संघाच्या वतीने कामगार कायद्यातील सुधारणा बाबत आणि देशातील कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. त्याचबरोबर 25 फेब्रुवारी 2026 रोजी देशभर निदर्शन करून भारतीय मजदू मजदूर संघाने या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधलेले होते. मात्र आश्वासन देऊनही अद्याप सरकारने त्या मागण्या बाबत निर्णय घेतले नाही. कायद्यात आवश्यक बदल न केल्यामुळे तसेच नवीन कायद्यातील अनेक तरतुदी कामगारांना अडचणीच्या असल्याने कामगारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. आश्वासन देऊनही सरकारने या विषयाबाबत निर्णय घेत नसल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी 17 ऑगस्ट 2026 रोजी देशभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालया समोर भारतीय मजदूर संघाच्या वतीने निदर्शन आणि धरणा आंदोलन करण्यात येणार आहे.
देशातील अनेक सामान्यवकंत्राटी कामगार देखील वेतन मर्यादा 21000 च्या पुढे गेल्यामुळे कामगार राज्य विमा योजनेच्या बाहेर जात आहे त्यामुळे त्यांना आरोग्य सुविधा मिळण्यात अडचणी येत आहे. तरी कामगार राज्य विमा योजना लागू होण्यासाठी वेतन मर्यादा 42 हजार रुपये करण्यात यावी.
तसेच भविष्य निर्वाह निधीची वेतन मर्यादा रुपये तीस हजार करण्यात यावी तसेच सदर वेतन मर्यादा ओलांडल्यानंतरही ही सामाजिक सुरक्षा असल्याने ऐच्छिक न ठेवता किमान त्या रकमेवर भविष्य निर्वाह निधी भरणे सक्तीचे करण्यात यावे.
त्याचप्रमाणे भविष्य निर्वाह निधी पेन्शन योजना किमान एक हजाराहून साडेसात हजारापर्यंत वाढवण्यात यावी.
ग्रॅच्युईटीची मर्यादा पंधरा दिवसांवरून तीस दिवसांपर्यंत वाढवण्यात यावी. तसेच ग्रॅच्यूटीची रक्कम मर्यादा 40 लाखापर्यंत वाढवण्यात यावी.
कामगार अथवा नियोक्ता सदर पेन्शन योजने अंतर्गत आल्या नंतर ती कायमस्वरूपी लागू राहील अशी सक्ती करण्यात यावी. वेतन मर्यादा वाढली अथवा अन्य कोणत्याही कारणाने ती ऐच्छिक करू नये,
तसेच बोनस कायद्याची लागू होण्याची वेतन मर्यादा 21000 वरून 42000 पर्यंत वाढवण्यात यावी.किमान बोनस रुपये 7000 ऐवजी 18 हजार रुपये करण्यात यावा. तसेच बोनस कायदा किमान दहा कामगारांपासून लागू करण्यात यावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. जोपर्यंत आमच्या या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असेच सुरू ठेवणार असल्याची माहिती पडते मजदूर संघाचे अध्यक्ष सुधांशू रानडे आणि सरचिटणीस किरण मिलगीर यांनी दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant