बोरीवली पूर्व येथे रोगप्रतिबंधक उपाययोजनांचा धडाका आणि स्वच्छता मोहीम
बोरीवली पूर्व येथे रोगप्रतिबंधक उपाययोजनांचा धडाका आणि स्वच्छता मोहीम
मुंबई-: मुंबई महापालिकेच्या सहकार्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नगरसेविका सौ सारिका शशिकांत झोरे यांनी
बोरीवली पूर्व येथील देवीपाडा व परिसरात डेंग्यू-मलेरिया निवारणासाठी घरोघरी धूरफवारणी आणि कीटकनाशक फवारणी यंत्रणा सज्ज केली आहे . डेंग्यू व मलेरिया निर्मूलनासाठी धुरफवारणी आणि कीटकनाशक फवारणीच्या विशेष मोहिमेचे उद्घाटन नुकतेच देवीपाडा, मागाठाणे, बोरिवली (पूर्व) येथे उत्साहात पार पडले.
गेल्या दोन दिवसांत देवीपाडा परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प इमारत (२२ मजले), विवेकानंद चाळ, जयवंत निवास, गौतम नगर, सिद्धिविनायक चाळ, विवेकानंद निवास, मासळी बाजार देवीपाडा, टायटॅनिक इमारत आणि शिवशंभो चाळ या भागांमध्ये धुरफवारणी व कीटकनाशक फवारणी पूर्ण करण्यात आली आहे. तसेच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन पाण्याचे पिंप, झाडांच्या कुंड्या आणि साचलेल्या पाण्याची पाहणी करून योग्य त्या आरोग्यदायी उपाययोजना राबविल्या.
शिवसेनेचे मागाठाणे विधानसभा निरीक्षक व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य श्री. शशिकांत झोरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष श्री. तानाजी शेलार, पालिका अधिकारी श्री. अंकुश राऊत, कृष्णा पालखंडे, डॉ. अरमान पत्तेकरी, शाखाप्रमुख सचिन मोरे, शाखासमन्वयक माधुरी खानविलकर, शाखा समन्वयक इतिश्री महाडिक तसेच अनुराधा मोरे, सीमा सानप, ममता गावडे, स्नेहल भोसले, मीनल नर, अंजना पवार, श्रद्धा सुर्वे, विनिता मडीये सिद्धेश शिरसाट, रमेश पाटील आणि महापालिकेचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade