एमपीएससीकडून राज्य सेवा परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
एमपीएससीकडून राज्य सेवा परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
मुंबई, दि. ५ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. उमेदवारांच्या मागणीचा विचार करून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 10 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत, तर ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 13 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.
या परीक्षेद्वारे एकूण 5,707 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, पूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकानुसार विविध मागण्यांचा समावेश करून पदसंख्या वाढविण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नसून, त्यांनी ‘My Account’ या पर्यायातून संबंधित माहिती अद्ययावत करावी, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी नियुक्तीपूर्वी करण्यात येणार असून, पात्रता सिद्ध न झाल्यास नियुक्तीस अपात्र ठरविण्यात येईल, असेही आयोगाने जाहिरातीत नमूद केले आहे. याबाबतचे शुद्धीपत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेत स्थळावर उपलब्ध असल्याचे आयोगामार्फत कळविण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade