बृहन्महाराष्ट्र मंडळाकडून सिएटलमध्ये जागतिक मराठी मेळावा
बृहन्महाराष्ट्र मंडळाकडून सिएटलमध्ये जागतिक मराठी मेळावा
सिएटल-: उत्तर अमेरिकेतील निसर्गरम्य सिअॅटल येथे मराठी भाषिकांचा सर्वात मोठा सांस्कृतिक, सामाजिक सोहळा – बृहन्महाराष्ट्र मंडळाकडून (BMM) 6 ते 9 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. सुमारे 2,500 मराठी बांधव, उद्योजक, कलाकार, साहित्यिक, तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक, BMM मराठी शाळेतील विद्यार्थी-शिक्षक, स्वयंसेवक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर ह्या चार दिवसांच्या महोत्सवात सहभागी होणार आहेत. प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. माधुरी कानिटकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अविनाश धर्माधिकारी उपस्थित राहणार आहेत
भारतातील नामवंत कलाकारही ह्या सोहळ्याची रंगत वाढवणार आहेत. सदाबहार विनोदी नाटक ‘ऑल दि बेस्ट’, लोकपरंपरेचा भव्य आविष्कार ‘द फोक आख्यान’, आरती अंकलीकर यांची ‘संगीत रस-सुरस’ मैफल, तसेच लोकप्रिय अभिनेते प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे यांचा ‘नाटकामागचे नाटक’ हा रंजक कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
‘स्वरमंच’ स्पर्धेसाठी डॉ. सलील कुलकर्णी यांची उपस्थिती स्पर्धकांना प्रोत्साहन देईल. संजय उपाध्ये, सुनंदन लेले आणि निलेश ओक यांच्या व्याख्यानांतून उपस्थितांना विचारांची समृद्धी अनुभवायला मिळेल. या विभागाचे नेतृत्व अश्विनी क्षीरसागर, शिल्पा कर्वे, प्रसन्न गणपुले आणि आरती लोटलीकर यांच्याकडे आहे.
स्थानिक कलाकारांच्या सहभागातून साकारला जाणारा भव्य उद्घाटन सोहळा महाराष्ट्राची संस्कृती, संगीत, नृत्य आणि खाद्यपरंपरेची झलक सादर करेल. पूर्णपणे उत्तर अमेरिकेत लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि निर्मिती झालेले ‘अवघा रंग एकची झाला’ हे नाटक आणि अमेरिकेत जन्मलेल्या नव्या पिढीने सादर केलेला ‘तीर्थ विठ्ठल’ हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नक्कीच प्रेक्षकांच्या खास पसंतीस येईल. त्याचबरोबर उत्तर अमेरिकेतील शेकडो कलाकार आणि स्पर्धक विविध दर्जेदार सादरीकरणांसाठी सज्ज आहेत. ह्या कार्यक्रमांचे नेतृत्व पराग सहस्रबुद्धे, संजय राऊत, शैलेन्द्र उपाध्ये आणि शीतल पटवर्धन करत आहेत.
बीएमएम 2026 हे व्यावसायिकांसाठीही सुवर्णसंधी ठरणार आहे. B-Connect आणि Real Estate Expo उद्योजकांसाठी नव्या गुंतवणुकीचे दालन खुले करेल. तसेच तरुणांसाठी Speed Dating आणि Candlelight Concert हे आधुनिक आणि संवादप्रधान उपक्रम विशेष आकर्षण ठरतील. ‘कलास्पंदन’ आणि ‘कलादालन’ च्या निमित्ताने प्रथमच जागतिक कीर्तीचे मराठी चित्रकार प्रमोद कुर्लेकर आणि सुचित्रा भोसले यांच्या कलाविश्वाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade