1.50 कोटीचे 49 फ्लॅट विकल्यानंतर बिल्डर पाडणार 18 मजली इमारत
1.50 कोटीचे 49 फ्लॅट विकल्यानंतर बिल्डर पाडणार 18 मजली इमारत
बंगळुरु-: हरलूर रोडवरील ‘एसएनएन राज एटरनिया’ प्रोजेक्टमधील १८ मजली टॉवरमधील १.५० कोटी किंमतीचे ४९ फ्लॅट्स विकल्यानंतर बिल्डरने स्वतःच ही इमारत पाडण्याचा निर्णय घेतला आहे. पजेशन देण्याआधीच हा धक्कादायक निर्णय घेतला आहे. याचा कोणताही भुर्दंड ग्राहकांना बसणार नाही. बिल्डर त्याच जागेवर नवी इमारत बांधून देणार आहे. इमारत पाडण्याचा निर्णय बिल्डरने का घेतला यामागचे कारण अत्यंत धक्कादायक आहे. बांधकामाच्या पायामध्ये झालेली गंभीर तांत्रिक चूक हे यामागील महत्त्वाचे कारण आहे.
इमारत पूर्णपणे तयार झाली. पण ताबा मिळण्याच्या अगदी आधी, जेव्हा बिल्डरच्या तांत्रिक टीमने अंतिम सुरक्षा तपासणीसाठी वॉटर लोड टेस्ट (पाण्याचा भार तपास) केली, तेव्हा अभियंते थक्क झाले. चाचणीदरम्यान, इमारत एका बाजूला किंचित झुकलेली दिसली. तपासात असे उघड झाले की, इमारतीच्या बांधकामाच्या सुरुवातीला मातीचे विश्लेषण करणाऱ्या बाह्य सल्लागाराने बोअरहोलच्या माहितीचा अर्थ लावण्यात गंभीर चूक केली होती, ज्यामुळे बहुमजली इमारतीच्या पायामध्ये संरचनात्मक असंतुलन निर्माण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
ताबा प्रमाणपत्र (OC) मिळाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच, सर्व 49 अपार्टमेंट विकले गेले. एका फ्लॅटची किंमत 1.50 कोची रुपये आहे. येथे फ्लॅट खरेदी करणारे ग्राहक फ्लॅटचा ताबा मिळण्याची वाट पाहत होते. तरीही, विकासकाने स्वतःहून टॉवर पाडून त्याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या फ्लॅट्सचे खरेदीदार प्रामुख्याने आयटी व्यावसायिक, कॉर्पोरेट अधिकारी आणि मध्यम व उच्च उत्पन्न गटातील कुटुंबे आहेत.
अनेक कुटुंबांनी नवीन घरांमध्ये जाण्यासाठी आपली जुनी भाड्याची घरे खाली करण्याची नोटीस आधीच दिली होती, तर काही जण वर्षानुवर्षे गृहकर्जाचे मोठे हप्ते भरत होते. या प्रकल्पात 15 टॉवर्स आणि 972 फ्लॅट्स असून, त्यापैकी 822 कुटुंबांनी आधीच ताबा घेतला आहे आणि उर्वरित टॉवर्स पूर्णपणे सुरक्षित आहेत. शॉर्टकट घेण्याऐवजी, बिल्डरने ग्राहकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन संपूर्ण टॉवर पाडून तो नव्याने बांधण्याचा निर्णय घेतला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर