महाबीज सोयाबीन बियाणं न उगवल्याने शेकडो शेतकरी अडचणीत
महाबीज सोयाबीन बियाणं न उगवल्याने शेकडो शेतकरी अडचणीत
नागपूर-: मान्सून लांबल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांच्या पीक पेरणीचे वेळापत्रकच गडबडले आहे. त्यातच शेतकऱ्यांना पेरेलेले सोयाबीन बियाणे न उगवल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांच्या उगवणक्षमतेबाबत तब्बल 844 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यानंतर न उगवलेल्या सोयाबीन बियाणांसंदर्भात महाबीजने चौकशी समिती नेमली आहे. याप्रकरणी अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. सोयाबीन बियाण्याची उगवण न होणे किंवा अत्यल्प उगवण होणे या समस्येने शेतकरी हैराण झाले आहेत. काही वेळा तर संपूर्ण शेत दुबार पेरणीच्या संकटात सापडते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.
दरम्यान, याआधी शेतकऱ्यांच्या बांधावर पंचनामे झाले आहेत. या प्राथमिक उगवणक्षमता चाचणी अहवालात कमी पावसात पेरणी झाल्याने बऱ्याच भागात सोयाबीन उगवण्यावर परिणाम झाल्याचे निदर्शनास आल्याचे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून सुरु असलेल्या चौकशीत बियाणे उत्पादनादरम्यान विहित प्रमाणित कार्यपद्धतींचे (SOP) पालन केले गेले होते का, याची तपासणी केली जाईल आणि काही त्रुटी आढळल्यास निश्चितचं निदर्शनास आणल्या जातील. जर पालन केले नसेल, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी दिला आहे.
महाबीज सोयाबीन उगवणक्षमतेबाबत शेतकऱ्यांच्या अधिक प्राप्त तक्रारी राज्यात मराठवाडा विभागातील आहेत. कमी पावसात सोयाबीन पेरणी केल्यामुळे बियाणे उगवणीवर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. 75 ते 100 मि.मी. पावसाअभावीचं अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केल्याचे निदर्शनास. दुसरे कारण, 3 ते 5 सें.मी. खोली पेक्षा अधिक खोली पेरणी केल्याने सोयाबीन उगवण क्षमतेवर परिणाम. तसंच काही ठिकाणी वाटप केलेल्या सोयाबीन बियाणे संदर्भात 0.29 टक्के सोयाबीन बियाणेमध्ये संशयता आहे. याची तपासणी सुरू आहे. तपासणी अखेर त्रुट्या आढळल्यास निदर्शनास आणल्या जाईल.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर