बनावट SIR लिंक पाठवून ६.७१ लाखांची फसवणूक
बनावट SIR लिंक पाठवून ६.७१ लाखांची फसवणूक
मुंबई-: मतदार यादीच्या विशेष तपासणी मोहिमेचा आधार घेत सायबर गुन्हेगारांनी नागरिकांची फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. बनावट पडताळणी लिंक पाठवून मानखुर्द येथील ७७ वर्षीय निवृत्त डॉक्टर डॉ. प्रताप रामचंद्र बोंगीरवार यांची तब्बल ₹६.७१ लाखांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.
डॉ. बोंगीरवार यांनी मतदार तपासणीसाठी अर्ज भरल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर २९ जुलै रोजी एक एसएमएस आला. संदेशात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा क्रमांक दिला होता. त्यांनी संपर्क साधल्यावर समोरील व्यक्तीने स्वतःला अधिकारी म्हणून ओळख दिली आणि अर्जातील नावात तफावत असल्याचे सांगितले. ऑनलाइन पडताळणीसाठी व्हॉट्सअॅपवर बनावट लिंक पाठवून आधार क्रमांक, मतदार ओळखपत्र क्रमांक व वैयक्तिक माहिती मागवली. पडताळणी शुल्क म्हणून ₹५ भरण्यास सांगितले.
व्यवहार अयशस्वी झाल्याचे दाखवून आरोपीने क्रेडिट कार्डद्वारे पुन्हा प्रयत्न करण्यास भाग पाडले. OTP संदेश सतत येऊ लागल्याने संशय आला. मोबाईल बंद करून तपासल्यावर बँक खाते व क्रेडिट कार्डमधून ₹६,७१,००६ रक्कम काढल्याचे आढळले. घटनेनंतर त्यांनी त्वरित राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधून तक्रार नोंदवली. ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचा इशारा
मतदार पडताळणी किंवा SIR प्रक्रियेसंदर्भात येणाऱ्या अनोळखी कॉल, एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप संदेशांवर विश्वास ठेवू नये.सर्व प्रक्रिया फक्त निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर कराव्यात.कोणत्याही परिस्थितीत बँक खाते, डेबिट/क्रेडिट कार्डची माहिती किंवा OTP अनोळखी व्यक्तींशी शेअर करू नये.
ही घटना नागरिकांना सावधगिरीचा इशारा देणारी आहे. फसवणूक करणारे अधिकृत मोहिमांचा आधार घेऊन बनावट लिंक पाठवतात, त्यामुळे प्रत्येकाने अधिकृत संकेतस्थळावरूनच पडताळणी करावी आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवावी.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade