विधान मंडळ सचिवालयातील१८ अधिकाऱ्यांना पदोन्नती.
विधान मंडळ सचिवालयातील१८ अधिकाऱ्यांना पदोन्नती.
मुंबई-: महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयातील उपसचिव, अवर सचिव, अवर सचिव (समिती) आणि कक्ष अधिकारी अशा एकूण १८ पदांवर अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. आज दिनांक ३ ऑगस्ट रोजी पदोन्नतीचे आदेश निर्गमित झाले असून अधिकारी वर्गाने त्याबद्दल माननीय पीठसीन अधिकारी तसेच सचिव यांच्या प्रति आभार व्यक्त केले आहेत.
पदोन्नती प्राप्त झालेल्या १८ अधिकाऱ्यांची नावे आणि पदोन्नतीचे पद पुढील प्रमाणे आहे.
पदोन्नतीनुसार उपसचिव पदाकरिता सीमा तांबे, पुष्पा दळवी आणि घननीळ देबडवार यांची निवड करण्यात आली आहे. तसेच अवर सचिव पदाकरिता विनोद राठोड, कैलास पाझारे, जयश्री म्हात्रे , जीवन गावकर, पवन म्हात्रे आणि नेहा कोठारी यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
अवर सचिव (समिती) पदासाठी नितीन अहेर, रविंद्र मेस्त्री आणि अलका पराडकर यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय कक्ष अधिकारी पदावर जान्हवी गमरे, दिनेश तरे, संतोष सुद्रिक , ज्योती कामतेकर, शुभांगी जगे आणि शितल मोरे यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
आज संध्याकाळी याबाबतचे आदेश विधान मंडळ सचिवालय, आस्थापना विभाग यांच्या मार्फत जारी करण्यात आले. पिठासीन अधिकारी यांच्या सचिवांनी ही प्रक्रिया जलद गतीने पूर्णत्वास नेली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade