चंदनवाडी येथील गोड गणपती तर्फे मुंबईतील १०० गणेशोत्सव मंडळांना मिळणार ३ कोटींचे विमा कवच
चंदनवाडी येथील गोड गणपती तर्फे मुंबईतील १०० गणेशोत्सव मंडळांना मिळणार ३ कोटींचे विमा कवच
मुंबई-अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि आदित्य बिर्ला ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय पांडुरंग सकपाळ यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील १०० गणेशोत्सव मंडळांना 3 कोटींचे मोफत वीमा कवच
दिनांक ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता
माधवबाग हॉल, सी. पी. टँक रोड. गुलालवाडी, भुलेश्वर, मुंबई
येथे करण्यात येणार आहे. यात गिरगाव, कुलाबा, खेतवाडी, ताडदेव, वरळी, लालबाग, भायखळा आदी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सहभाग असेल.
मंडळ हे येत्या पुढील वर्षी आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणार आहे, पाच दशकांच्या ही यशस्वी वाटचाल साजरी करत असताना केवळ उत्सवाचा डामडौल न करता समाजाला आणि इतर मंडळांना उपयुक्त ठरेल असा हा उपक्रम राबवण्याचा संकल्प मंडळाकडून करण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवार, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात करण्यात येणार आहे. वाढत्या खबरदारीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव अधिक सुरक्षित व्हावा आणि लहान-मोठ्या मंडळांना आर्थिक संरक्षण मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या विमा कवचामध्ये गणेशोत्सव कालावधीमध्ये मंडप व सजावटीचे संरक्षण, सुवर्ण अलंकार विमा, कार्यकर्त्यांसाठी अपघाती सुरक्षा यांचा समावेश आहे.
अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे वर्षभर रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, शैक्षणिक मदत, दुष्काळग्रस्त व पूरग्रस्त विभागातील नागरिकांना मदतीचा हात यासारखे विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. त्याच सामाजिक भावनेतून आम्ही हा उपक्रम राबविण्यात येत असून, मुंबईतील सर्व गणेशोत्सव मंडळांकडून त्याचे स्वागत करण्यात येत आहे.
तरी जास्तीत जास्त मंडळानी या उपक्रमाचा लाभ घावा असे आवाहन मंडळाचे सचिव प्रथमेश पांडुरंग सकपाळ यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
मिलिंद झोरे – ७९७७३१८१७५
राहुल गायकर – ९३२४९८७५९९
स्वप्नील महाडिक – ८१६९०५१९०८
जुगल खेतलपार – ७७३८२७४४६९
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade