12% पेक्षा जास्त अल्कोहोल असलेल्या औषधांची खुली विक्री बंद
12% पेक्षा जास्त अल्कोहोल असलेल्या औषधांची खुली विक्री बंद
मुंबई, दि. १०:केंद्र सरकारने 12% पेक्षा जास्त अल्कोहोल असलेल्या औषधांची खुली विक्री बंद केली आहे. आता ही औषधे डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय विकली जाणार नाहीत. औषधांचा गैरवापर रोखण्यासाठी सरकारने ड्रग्स रूल्स, 1945 मध्ये हा बदल केला आहे.
नवीन नियमानुसार, ज्या पिण्याच्या औषधांमध्ये इथाइल अल्कोहोलचे प्रमाण 12% पेक्षा जास्त असते आणि जी 30 मिलीलीटरपेक्षा मोठ्या बाटलीत विकली जातात, त्या सर्व औषधांचा ‘शेड्यूल H1’ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.
या बदलानंतर आता या औषधांची खुलेआम विक्री होणार नाही आणि मेडिकल स्टोअर्ससाठी ती विकण्याचे नियम खूप कडक होतील. याव्यतिरिक्त, औषध दुकानदारांना या औषधांच्या विक्रीचा संपूर्ण रेकॉर्ड एका वेगळ्या रजिस्टरमध्ये ठेवावा लागेल.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या औषधांचा नशेसाठी होणारा वापर रोखण्यासाठी आणि पुरवठा नियंत्रित करण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Rajkummar Rao
- जन्मदिन
- August 31
Nagarjuna Akkineni
- जन्मदिन
- August 29
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर