अष्टपैलू रंगकर्मी श्री. प्रशांत दामले यांची ‘बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान’ च्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदी नियुक्ती
अष्टपैलू रंगकर्मी श्री. प्रशांत दामले यांची ‘बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान’ च्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदी नियुक्ती
मुंबई - मराठी रंगभूमीवरील अष्टपैलू अभिनेते, गायक, निर्माते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रशांत पुरुषोत्तम दामले यांची ‘बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान’ च्या व्यवस्थापकीय विश्वस्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबईच्या महापौर तथा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष श्रीमती रितू राजेश तावडे यांच्या हस्ते श्री. प्रशांत दामले यांना आज (दिनांक १० जुलै २०२६) नियुक्ती पत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर दालनात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमास उपमहापौर श्री. संजय घाडी, सभागृह नेते श्री. गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाच्या नुकत्याच झालेल्या सभेत श्री. दामले यांच्या नियुक्तीच्या निर्णयास सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. त्यानुसार नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.
श्री. प्रशांत दामले यांचा संक्षिप्त परिचय – शाळकरी वयातील गाण्यापासून जागतिक विक्रमांपर्यंतचा प्रवामूळचे मुंबईकर असलेल्या श्री. प्रशांत दामले यांना शालेय जीवनापासूनच गाण्याची प्रचंड आवड होती. पुढे महाविद्यालयीन जीवनात त्यांच्यात अभिनयाची आणि नाटकांची आवड निर्माण झाली. त्यांनी १९७८ ते १९८३ या काळात समांतर रंगभूमीवर काम करून आपल्या अभिनयाचा पाया मजबूत केला. १९८३ मध्ये आलेल्या ‘टूरटूर’ या पहिल्या व्यावसायिक नाटकाने त्यांच्या कारकीर्दीला खऱ्या अर्थाने कलाटणी दिली. त्यानंतर श्री. दामले यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. आजवरच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी तब्बल ३६ विविध नाटकांमधून १३,५३८ पेक्षा अधिक प्रयोगांचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांच्या या कामगिरीची नोंद घेत ४ लिमका बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये त्यांचे नाव कोरले गेले आहे.
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि सन्मान –
श्री. प्रशांत दामले यांनी केवळ अभिनेता म्हणूनच नाही, तर एक उत्तम गायक, सूत्रसंचालक आणि निर्माता म्हणूनही आपली छाप उमटवली आहे. त्यांच्या कलाक्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना केंद्र शासनाचा मानाचा ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले आहे. मागील तीन वर्षे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून ते धुरा सांभाळत आहेत. सामाजिक क्षेत्रातही ते अग्रेसर असतात.
नवी जबाबदारी आणि विश्वास –
बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदाची धुरा आता श्री. प्रशांत दामले यांच्यासारख्या अनुभवी, अभ्यासू आणि लोकप्रिय कलावंताकडे सोपवण्यात आली आहे. श्री. दामले यांच्या या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत, त्यांच्या अनुभवाचा फायदा प्रतिष्ठानच्या पुढील वाटचालीस निश्चित होईल, असा विश्वास प्रतिष्ठानच्या अध्यक्ष तथा महापौर श्रीमती रितू तावडे यांच्यासह उपमहापौर श्री. संजय घाडी, सभागृह नेते श्री. गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे, शिवसेना गटनेते श्री. अमेय घोले यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य यांनी व्यक्त केला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Rajkummar Rao
- जन्मदिन
- August 31
Nagarjuna Akkineni
- जन्मदिन
- August 29
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant