आठवड्यातून तीन दिवस दिवा-चिपळूण अनारक्षित मेमू सेवा
आठवड्यातून तीन दिवस दिवा-चिपळूण अनारक्षित मेमू सेवा
मुंबई - उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी मोठी सोय करून ठेवली आहे. रेल्वे प्रशासनाने यंदा प्रथमच उन्हाळी सुट्टीकरिता चिपळूण-दिवा अनारक्षित मेमू स्पेशल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. १ मेपासून ही स्पेशल मेमू कोकणवासियांच्या सेवेत दाखल होणार आहे. आठवड्यातून शुक्रवार, शनिवार आणि रविवारी धावणाऱ्या स्पेशलच्या ७ जूनपर्यंत फेऱ्या धावणार आहेत. जादा विशेष गाड्या चालवण्याची मागणी होत असतानाच रेल्वे प्रशासनाने चिपळूण-दिवा मेमू स्पेशल जाहीर केली. त्यामुळे कोकणवासीयांना दिलासा मिळाला आहे.
रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्यानुसार, ही गाडी साप्ताहिक स्वरूपाची असून शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा तीन दिवशी धावेल. १ मे ते ७ जून २०२६ या कालावधीत ही सेवा उपलब्ध राहणार आहे. गाडी क्रमांक ०११६० चिपळूण-दिवा स्पेशल चिपळूणवरून दुपारी १५.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २३.१० वाजता दिवा स्थानकात पोहोचेल.
परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक ०११५९ दिवा-चिपळूण स्पेशल रात्री २३.२५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता चिपळूणला पोहोचेल. ८ डब्यांच्या या गाडीमुळे खेड, माणगाव, रोहा आणि पेण यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवरील प्रवाशांना मोठा आधार मिळणार आहे. पूर्णपणे अनारक्षित असल्याने ऐनवेळी प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही सेवा ‘लाईफलाईन’ ठरू शकते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade