निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या विशेष मोहिमेला जल्लोषात सुरुवात
निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या विशेष मोहिमेला जल्लोषात सुरुवात
मुंबई-निवडणूक आयोगामार्फत मतदार याद्यांची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी स्पेशल इंटेंसिव रिव्हिसन विशेष मोहीम भायखळा विधानसभा क्षेत्रात नुकतीच राबविण्यात आली. या मोहिमेची आमदार मनोज पांडुरंग जामसुतकर तसेच निवडणूक निर्णय अधिकारी श्री.कृष्णा जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जागेवर जाऊन पाहणी केली.
या मोहिमेच्या अनुषंगाने जामसुतकर यांनी आज विविध केंद्रांना भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी सुरू असलेल्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला तसेच प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
मतदार यादी अधिक अचूक व परिपूर्ण व्हावी यासाठी प्रशासन व नागरिकांनी समन्वयाने कार्य करण्याचे महत्त्व आमदार जामसूतकर यावेळी अधोरेखित केले. सोबत नगरसेविका अमरीन शेहजाद अब्राहानी, भायखळा विधानसभा महिला समन्वयक सुरेखा राऊत, संघटिका चंदना साळुंखे, शाखा प्रमुख सुहास भोसले, काका चव्हाण, सलीम शेख, विनोद शिर्के, शाखा समन्वयक सुनिल हिरवे, महिला शाखा समन्वयक विद्या राबडिया तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्याने या शिबिरात स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला होता.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade