छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान अंतर्गत लाभार्थ्यांना रायगड येथे दाखले वाटप
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान अंतर्गत लाभार्थ्यांना रायगड येथे दाखले वाटप
मुंबई - राज्य सरकार अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान अंतर्गत नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळावा याकरिता राज्यभरात शासकीय यंत्रणा सुसज्ज होऊन हे अभियान यशस्वीरित्या राबवत आहेत…यामध्ये रायगड जिल्ह्यात अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हे अभियान राबविण्यात शासकीय व निमशासकीय यंत्रणांना यश मिळाला आहे आज संदेरी येथील नॅशनल हायस्कूल या ठिकाणी म्हसळा तालुका प्रशासनाच्या वतीने कॅम्प आयोजित करण्यात आले होते.
त्यामुळे शेकडो नागरिकांना याचा लाभ मिळाला …
सदर कॅम्प तहसिल कार्यालय म्हसळा यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती कार्यालय ,तालुका कृषी विभाग ,तालुका आरोग्य विभाग , ग्रामसेवक प्रशासक,तलाठी , पोलीस पाटील, csc चालक ,यांच्या अंतर्गत प्रलंबित फेरफार निकाली काढणे ,अभिलेख दुरुस्ती,विविध दाखले, अकृषिक तरतुदी मार्गदर्शन, आग्रिस्टेक योजना, शिधापत्रिका,आयुष्मान भारत, क. जा. प तयार करणे,मुख्यमंत्री बळी राज शेत पानद रस्ते योजना, ई मोजणी , पी. एम किसान योजना,पोट हिस्सा मोजणी इत्यादी सेवा तालुक्यातील नागरिकांना देण्यात आल्या, अतिशय उत्कृष्ट कामगिरी सर्व विभागातील शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाने बजावली आहे.तयार झालेल्या दाखल्यांचे वाटप आज तालुका तहसीलदार, श्री.समीर खाडे,पंचायत समिती सभापती बबन जी मनवे,
नायब तहसीलदार मॅडम, तसेच मंडळ अधिकारी शाह अनिल बसवत, लहू म्हात्रे, निंबरे मॅडम,यांच्या हस्ते करण्यात आले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade