सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा उघडले ‘भारतमाता’ सिनेमागृह
सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा उघडले ‘भारतमाता’ सिनेमागृह
मुंबई -अनेक गोल्डन ज्युबिली, सिल्वर ज्युबिली चित्रपट गाजवणारे मुंबईतील प्रख्यात भारतमाता चित्रपटगृह तब्बल ६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रसिकांसाठी खुले झाले आहे. लालबाग आणि परळ परिसरातील हे चित्रपटगृह नव्या आधुनिक रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. दक्षिण मुंबईतील मराठी प्रेक्षकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. 1941 मध्ये सुरू झालेल्या या चित्रपटगृहाचे नाव , त्यावेळी नाव लक्ष्मी टॉकीज असे होते. नव्या रूपातील भारतमाता सिनेमामध्ये प्रेक्षकांसाठी डॉल्बी सराउंड साउंड आणि 2के लेझर प्रोजेक्शनची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाचा आवाजी आणि दृश्य अनुभव अधिक स्पष्टपणे घेता येणार आहे.
मराठी चित्रपटांच्या वैभवाचा काळ अनुभवलेले हे चित्रपटगृह 2018 पासून काही तांत्रिक कारणांमुळे बंद होते. आता मुक्ता ए2 आणि वन सिनेमाज यांनी एकत्रितपणे या चित्रपटगृहाचा कायापालट केला आहे. प्रेक्षकांना आता येथे अत्याधुनिक वातानुकूलित यंत्रणा, 409 इतकी आसन क्षमता आणि अत्यंत आरामदायी सीट्स पाहायला मिळतील. विशेष म्हणजे, तांत्रिक सुधारणा करताना या वास्तूचा ऐतिहासिक वारसा आणि मूळ ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न व्यवस्थापनाकडून करण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर