राज्यातील ८९१ कोटी रुपयांच्या त्रुटींवर ‘कॅग’चे ताशेरे
राज्यातील ८९१ कोटी रुपयांच्या त्रुटींवर ‘कॅग’चे ताशेरे
मुंबई - भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) यांनी महाराष्ट्राच्या प्रशासनातील ‘प्रणालीगत त्रुटी’अधोरेखित केल्या आहेत. विविध विभागांनी गेल्या दशकाभरात वारंवार स्मरणपत्रे देऊनही १०,००० हून अधिक ‘ऑडिट’ प्रश्नांना केराची टोपली दाखवल्यामुळे ८९१ कोटी रुपयांच्या संभाव्य आर्थिक अनियमितता समोर आल्या आहेत.
प्रमुख आकडेवारी आणि निष्कर्ष
प्रलंबित अहवाल : जून २०२३ पर्यंत २,४०८ तपासणी अहवाल प्रलंबित होते, ज्यामध्ये १०,३४० परिच्छेद (प्रश्न) निराकरणाविना पडून आहेत.
आर्थिक फटका : २०२२-२३ च्या स्वतंत्र स्थानिक ऑडिटमध्ये ८९१.२९ कोटी रुपयांच्या महसूल परिणामांसह २,११९ आक्षेप नोंदवण्यात आले. मात्र, त्यापैकी केवळ २५.५८ कोटी रुपयांची वसुली वर्षभरात होऊ शकली.
गंभीर अनियमितता : या ऑडिट परिच्छेदांमध्ये निधीचा अपहार, अनधिकृत खर्च आणि नियमांचे उल्लंघन यांसारख्या विशिष्ट निरीक्षणांचा समावेश आहे, ज्यावर वेळेत कार्यवाही करणे आवश्यक होते.
राज्य विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात आलेल्या अहवालात, ‘कॅग’ने विविध विभागांकडून कृती अहवाल दाखल करण्यात होणाऱ्या विलंबावर कडक टीका केली आहे. २,४०८ तपासणी अहवालांमधील प्रश्नांची उत्तरे देण्यात राज्याला आलेले अपयश हे ‘प्रशासकीय जबाबदारी’ आणि विधिमंडळाच्या देखरेखीला कमकुवत करणारे असल्याचे अहवालात म्हटले आहे.
कॅगने काही खात्यांविषयी विचारलेले प्रश्न गेल्या दशकाहून अधिक काळापासून प्रलंबित असून, संबंधित विभागांनी त्यांना अनुत्तरित ठेवले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade