महानगरपालिके मार्फतच्या आरोग्य सुविधांचा स्थानिक पातळीवर व्यापक प्रचार, प्रसार करण्यात यावा – आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे
महानगरपालिके मार्फतच्या आरोग्य सुविधांचा स्थानिक पातळीवर व्यापक प्रचार, प्रसार करण्यात यावा – आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे
मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येणाऱया आरोग्य सुविधांची माहिती आरोग्य समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांना मिळावी, या उद्देशाने आज (दिनांक २४ मार्च २०२६) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेचा भाग असलेल्या प्रमुख रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य विभाग, उपनगरीय रुग्णालये अशा विविध विभागांच्या प्रमुखांनी आरोग्य समिती सदस्यांसमोर सविस्तर सादरीकरण केले. यावेळी महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱया आरोग्य सुविधांचा प्रचार, प्रसार स्थानिक पातळीवर अधिक प्रभावीपणे करण्याच्या सूचना आरोग्य समितीचे अध्यक्ष श्री. हरिश भांदिर्गे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिल्या.
या बैठकीला सर्व आरोग्य समिती सदस्य, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. शरद उघडे, संचालक (प्रमुख रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये) डॉ. शैलेश मोहिते, सर्व प्रमुख रुग्णालयांचे अधिष्ठाता, आरोग्य विभागातील विविध उपविभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिका संचलित प्रमुख रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये, सार्वजनिक आरोग्य विभाग, उपनगरीय रुग्णालये यांच्या माध्यमातून पुरविण्यात येणा-या आरोग्य क्षेत्रातील सेवा सुविधांची माहिती विस्तृतपणे सादरीकरणाच्या माध्यमातून मांडण्यात आली. आरोग्य यंत्रणेतील रुग्णालयांच्या ठिकाणची सुसज्जता, रुग्णशय्यांची संख्या, कर्मचारी वर्गाची क्षमता आदी माहिती यावेळी सादर करण्यात आली. त्यासोबतच आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी प्रगतिपथावर असणारी पायाभूत सुविधा विकासाची कामे, रुग्णालयाच्या क्षमता विकासासाठीची अभियांत्रिकी कामे, रुग्णशय्या क्षमतावाढ आदींची माहिती सादरीकरणाच्या निमित्ताने देण्यात आली. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून झोपडीपट्टी भागात पुरविण्यात येणाऱया आरोग्य सुविधा याबाबतच्या माहितीचे सादरीकरण करण्यात आले. तसेच रक्तदाब, मधुमेह, सकस आहार, योग यासाठीच्या विविध पुढाकारांची माहितीही सदस्यांना देण्यात आली. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून पुरविण्यात येणा-या विविध वैद्यकीय सुविधांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य संस्थांच्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी. त्याअनुषंगाने आरोग्य सुविधांचा स्थानिक पातळीवर अधिक प्रचार आणि प्रसार करण्याची सूचना आरोग्य समिती अध्यक्ष श्री. हरिश भांदिर्गे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला केली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant